सातारा पोलीसांकडून विधानसभा निवडणुक काळात एका बोलेरो कार मधून १५ लाखाची रक्कम केली हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा ;

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, तासवडे टोल नाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक विशेष कारवाई करण्यात आली. 26 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 01:00 ते 04:00 या वेळेत, कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक GJ 27 EE 8738 ला संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे 02:30 वाजता थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान, वाहनामध्ये 15 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. सदर वाहन व रोख रक्कम तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली. घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून पुढील तपासासाठी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदर रक्कम कुठून आली व ती कोणाकडे जाणार होती, याचा तपास सुरू आहे. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी मागील व पुढील लिंकचा शोध घेण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट