सातारा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे पाल्यां करीता रोजगार मेळावा शिबिर…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्री समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने व अॅक्सिस बैंक लि. सातारा यांचे संयुक्त विदयमाने सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या पाल्यांकरीता रोजगार मेळावा दिनांक 05/04/2023 रोजी सकाळी 10.00 ते 15.30 यावेळेत पोलीस करमणुक केंद्र सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

सदर रोजगार मेळाव्याचा लाभ 150 पोलीस पाल्य यांनी घेतला. सदर रोजगार मेळाव्यास अॅक्सिस बँक लि. सातारा ये क्लस्टर हेड श्री शैलेश नांद्रे, अॅक्सिस बैंक लि. एमआयडीसी सातारा शाखा प्रमुख श्री निलेश गायकवाड, अॅक्सिस बैंक लि.पुणे एचआर श्री केदार कुलकर्णी, अलिड सॉप्टवेअर प्रा. लि. पुणे चे श्री विजय माहिते, तसेच इन्स्टीटयुट ऑफ बँकिंग अँन्ड फायनान्स स्किल अॅकॅडमी चे श्री विवेक अजमाने यांचे सहकार्य लाभले अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांनी रोजगार मेळाव्याकरीता आलेल्या सर्व पोलीस पाल्यांना मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले.

सदर मेळाव्यास श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री कमलेश मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन मा. पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री डी.एस. वाळवेकर, व स्टाफ पोलीस कल्याण विभाग यांनी केले. यापुढेही पोलीस पाल्यांकरीता रोजगार मेळावे राबविण्यात येणार आहेत. याकरीता पोलीस अधिकारी अमलदार पोलीस पाल्य यांनी पोलीस कल्याण कार्यालय सातारा यांच्या संपर्कात रहावे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट