सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलीस अभिलेखावरील पाहिजे असले आरोपीस पकडुन मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड…

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:- दिनांक :- १९/०९/२०२३ श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाण पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन त्यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेच्या सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक १५/०१/२०२३ रोजी श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना बातमी मिळालेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र भोरे, व पोलीस पथकाने महागाव ता.जि. सातारा गावचे हद्दीत सातारा कोरेगाव रोडवर महागाव हिल्स समोर रस्त्यावर सापळा लावुन पोलीस अभिलेखावरील आरोपी प्रल्हाद रमेश पवार रा. जुना मोटर स्टैंड भाजी मंडई सातारा यास पकडुन त्याचे ताब्यातून २०,०००/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एमएच ०९ / सीई ७७३४ ही जप्त केली असुन नमुद मोटर सायकल चोरीस गेलेबाबत सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ११२७ / २०२२ भादविंसक ३७९ प्रमाण दाखल आहे.
सदर कारवाई श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस अंमलदार पोहवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांवळे, शरद वेबले, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी सहभाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com