सातारा जिल्हात सुशिक्षित व बेरोजगार युवकांच्या विकासासाठी उंच भरारी योजना…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सातारा :दिनांक १४/०२/२०२५ रोजीसातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी मार्च २०२३ पासून उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३५ या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आज दिनांक १४/०२/२०२५ रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर, लोहगाव, पुणे व अहिल्यानगर (अहमदनगर) यांचे माध्यमातुन ४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातुन १. दुचाकी मॅकेनिक, २. चारचाकी मॅकेनिक ३. असिस्टंट इलेक्ट्रीशियन व ४. प्लंबींग या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता पुसेगांव १२, वाई ७, वडुज ५. सातारा तालुका व भुईंज प्रत्येकी ४, दहिवडी, बोरगांव, कराड तालुका प्रत्येकी २, तसेच रहिमतपुर, फलटण ग्रामीण, पाटण, ढेबेवाडी, व मसुर प्रत्येकी १ असे वरील पोलीस ठाणे यांनी युवकांना एकत्र करुन एकुण ५१ युवकांना मा. पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व युवकांना वाहनातुन भोर, पुणे व अहिल्यानगर येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग / मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट इलेक्ट्रीशियन, ५. प्लंबिंग, ६. वेल्डींग या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, लोहगाव पुणे, भोर जि.पुणे, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. आजअखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ९११ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट