सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातूननिवड…

सह संपादक – रणजित मस्के
यवतमाळ

यवतमाळ येथे दि.१६/०४/२०२५ ते १७/०४/२०२५ रोजी पार पडलेल्या १९ वर्षाखालील बॉक्सींग महाराष्ट्र संघ निवड चाचणी मध्ये सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील प्रशिक्षणार्थी चि. सैफअलि साजिद झारी (९० किलो) सुवर्ण पदक, कु. श्रुती सचिन शिंदे (७०-७५ किलो) सुवर्ण पदक, कु. प्रांजली दिपक रावळ (७५-८०किलो) – रौप्य पदक, कु. अपूर्वा प्रशांत कदम (५७ ६० किलो) कांस्य पदक कु.सृष्टी अमोल मोरे (६०-६५ किलो) कांस्य पदक, चि. रोहन विजय शिंदे (६५-७० किलो) कांस्य पदक, चि. श्रीराज सतिश शिंदे (८०-८५ किलो) कांस्य पदक अशी ०२ सुवर्ण, ०१ रौप्य व ०४ कांस्य अशी एकूण ०७ पदके प्राप्त केलेली आहेत व सुवर्ण पदक विजेते खेळाडू यांची १९ वर्षा खालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. तसेच शालेय राज्यस्तरीय बॉक्सींग क्रीडा स्पर्धेमध्ये चि. शौर्य योगेश बनकर वाने सुवर्ण पदक प्राप्त करुन आगामी होणाऱ्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना श्री सुनिल सपकाळ स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक पोहवा /१९० सागर जगताप (एन. आय.एस. बॉक्सींग प्रशिक्षक), मपोकों / ८४ पुजा शिंदे (बॉक्सींग प्रशिक्षक) यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील निवड झालेले प्रशिक्षणार्थी व त्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलेले प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उप-अधीक्षक (गृह), श्री. राजू शिंदे राखीव पोलीस निरीक्षक, श्री सुनिल चिखले पोलीस उप-निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सातारा यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.