सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, ५ वी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम किल्ले संतोषगड संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :– दिनांक ०५/०३/२०२३ रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले संतोषगड या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये फलटण उपविभागातील फलटण शहर, फलटण ग्रामीण, शिरवळ, लोणंद व खंडाळा या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान किल्ले संतोषगड पायथा येथे एकत्रीत येवून चढाई ( ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ले संतोषगड येथे महालक्ष्मी मंदीर व शिवकालीन बारव (विहीर) तसेच इतर ठिकाणी नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान जैविक व अजैविक अंदाजे ५५ किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर संत गाडगे महाराज निवासी आश्रमशाळा, ताथवडा येथे एकत्र जमून स्थानिक नागरिक श्री. मोहन निवृत्ती जाधव यांनी संतोषगडाबद्दल माहिती दिली.

सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग, श्री.बी.सी. गोडसे, पो.नि., फलटण ग्रामीण पो.ठाणे, श्री. एम.के. इंगळे, पो. नि. खंडाळा पो. ठाणे, श्री. एन. के. मदने, पो. नि., शिरवळ पो. ठाणे, श्री. व्ही. के. वायकर, स.पो.नि., लोणंद पो.ठाणे, श्री. नितीन शिंदे स.पो.नि. फलटण शहर पो.ठाणे, श्री. एस. बी. भोसले सपोनि फलटण ग्रामीण पो. ठाणे असे २० पोलीस अधिकारी, ११२ पोलीस अंमलदार व ७६९ नागरीक, पत्रकार, व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत १ ) अजिंक्यतारा (दि.१५/०१/२०२३), २) वसंतगड (दि.२२/०१/२०२३). ३) जरंडेश्वर (दि.२९/०१/२०२३), ४) वैराटगड (दि.०५/०२/२०२३) ५) संतोषगड (दि.०५/०३/२०२३) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आजअखेर ८० पोलीस अधिकारी, ४८१ पोलीस अंमलदार, १४५० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ५९९ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट