सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, ४ थी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम किल्ले वैराटगड संपन्न…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : दिनांक ०५/०२/२०२३ रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले वैराटगड या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाई उपविभागातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज, व मेढा या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान किल्ले वैराटगडाच्या पायथा येथील भवानी माता मंदिर, आसले येथे एकत्रीत येवून चढाई ( ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ल्यावरील किल्ले वैराटगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याने भरलेला तलाव कोरडा तलाव, किल्ल्यावरील सदर येथील झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान जैविक व अजैविक अंदाजे ८० किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर वैराटेश्वर मंदीर सभा मंडपात राहुल गोळे, वैराटेश्वर प्रतिष्ठान, व्याजवाडी व रोहन भोसले, भुईंज यांनी वैराटगडाबद्दल व गड संवर्धन बद्दल माहिती दिली.


श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती शितल जानवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग, वाई, श्री.बी.एस. भरणे पो.नि. वाई पो.ठाणे, श्री. आर. एस. गर्जे, स.पो.नि., भुईंज पो.ठाणे, श्री. एस. व्ही. तासगावकर, स.पो.नि. मेढा पो.ठाणे, श्री. आर. जे. माने, स.पो.नि., पाचगणी पो.ठाणे, श्री. बिद्री, पो.उ.नि. महाबळेश्वर पो. ठाणे असे १२ पोलीस अधिकारी, ७० पोलीस अंमलदार व ११५ नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.



दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जवाबदारी मोहिमेअंतर्गत १) अजिंक्यतारा (दि.१५/०१/२०२३), २) वसंतगड (दि.२२/०१/ २०२३), ३) जरंडेश्वर (दि.२९/०१/२०२३), ४) वैराटगड (दि.०५/०२/२०२३) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आजअखेर ६० पोलीस अधिकारी, ३६९ पोलीस अंमलदार, ६९० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ५४४ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com