सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याकरिता सरावलेल्या २ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी २ वर्षाकरीता केले तडीपार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस वाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे प मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोली प्रमुख

१) किरण रमेश आवारे, वय २० वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा.

२) कुमार लालासो काकडे, वय २१ वर्ष, रा. बिची, ता. फलटण, जि. सातारा यांचेवर जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, दुखापतफरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. सुनिल महाडीक यांनी मदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण मातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाचतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चोकसी श्री. राहुल आर. घस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर वेव्ळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेचर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठया प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांचर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती, दरील टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा पांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो.का. कलम ५९ प्रमाणे १९ उपद्रवी टोळयांमधील ६३ इसमांना, म.पो.का. कलम ५६ प्रमाणे १७ इसमांना व म.पो.का. कलम ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ८२ इसमांचे विरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कड़क कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा पांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो. हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण

ग्रामिण पोलीस ठाणेचे पो. हवा. वैभव सूर्यवंशी, पो.ना. श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट