सातारा जिल्ह्यात दरोड्यातील चोरीस गेलेली रक्कम पोलीसांनी केली परत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

दि.२८/०५/२०२३ रोजी रात्री १२.१० वा. चे सुमारास मौजे काशिळ ता. जि. सातारा गावचे हदीत एन.एच.४ हायवे रोडवरुन बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच.४३ बी.पी.८४२७ ही जात असताना इनोव्हा कार के. एम. एच.०६ बी.एम.३७१५ मधील चालकाने अचानक आडवी मारुन गाडी थांबवुन इनोव्हा कारमधुन अनोळखी इसम उतरुन व मोटार सायकलवरून आलेले अनोळखी इसमांनी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार गोलुसिंग दिनेशसिंग परमार यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारुन जबरदस्तीने खाली उतरवुन त्यांचे ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच.४३ बी.पी. ८४२७ घेवुन जावुन त्यामधील १७,६२,०००/- रु.एकुण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने व १७ किलो चांदीचे दागिने असलेल्या कुरिअर पार्सल बॉक्स जबरदस्तीने चोरून नेहले बाबत संतकुमारसिंग पुरणसिंग परमार वय २५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर मुळ रा. जारगा ता. बसेडी जि.धौलपुर राज्य राजस्थान सध्या रा. २१६ मेडीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापुर यांनी बोरगाव पोलीस ठाणेस गु. रजि. नं. २००/२०२३- भा.दं.वि. कलम ३९५.३४१.३३६ प्रमाणे तक्रार दाखल केली होती.

‘सदर गुन्ह्यातील अनोळखी ९ आरोपींचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व डी.बी.पथक, स्था. गु.शा. पथक सातारा यांनी गुन्हा घडले पासुन गुन्हा उघड करण्याच्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांना सतर्क करुन गुन्हेगाराच्या मागावर होते. आरोपीची गोपनिय माहिती मिळालेनंतर त्यांना सापळा लावुन ताब्यात घेतले.

आरोपींनी गुन्हा केलेचे कबुली देवुन आरोपीचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल १९.८४.२५५/- रु. किमतीची १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १८७०० किलोग्रॅम चांदीचे दागिने हा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्याचे तपासकामी जप्त करणेत आला होता. सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेनंतर फिर्यादी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार राजकिशोर मास्टरसिंह परमार रा. रवियापुरा ता. बसेडी जि.पौलपुर राज्य राजस्थान सध्या रा. २५६, डीगल्ली, शिवाजी चौक, कोल्हापुर यांना परत करणेत आला आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा, मा. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारायांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे, सहा. पोलीस निरीक्षक, पो.कॉ. विशाल जाधव, मुद्देमाल कारकुन म.पो.ना. नम्रता जाधव, मोना निंबाळकर यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट