सातारा शहर पोलीस ठाणेचा कारभार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हाती…!

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सातारा :आज दि.०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने सातारा शहर पोलीस ठाणेमध्ये महिलांच्या कार्यास प्रेरणा देण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाणेस काम करणाऱ्या एकूण ७५ महिल अधिकारी/अंमलदार यांचा मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी शाल, श्रीफळ देऊन फेटे बांधून सत्कार केला आहे.महिला दिनाचे औचित्याने प्रभारी अधिकारी श्री. राजेंद्र मस्के साो, यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचा कार्यभार महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती इंगळे यांचेकडे दिला तसेच पोलीस ठाणेस डे ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जैसस्वाल, ठाणे अंमलदार म्हणून महिला सहायक फौजदार श्रीमती. अनबुले, सीसीटीएनएस/रोटेशन करीता म.पो.कॉ. फाळके, शिंदे, कलगुटकी, देशमुख, धारेराव, शेवाळे, जुंजार, भोसले, शिंगाडे यांनी तसेच हजेरी मेजर म्हणून म.पो. हवा. शिंदे, कोर्ट पैरवी म्हणून म.पो. हवा. जायकर, देखणे तसेच क्राईम कामकाज म.पो.कॉ. प्रियांका धनावडे, कारकून कामकाज म.पो.कॉ. ज्योती गोळे तसेच गोपनीय कामकाज म.पो.कॉ. कोमल गोडसे, बारनिशी कामकाज म.पो. कॉ. पुजा शिंदे, गार्ड अंमलदार म्हणून म.पो.हवा. बेंद्रे, खरात यांनी कामकाज पाहिले आहे. पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रविवार पेठ चौकी, सदरबझार पोलीस चौकी, गोडोली चौकी, एमआयडीसी चौकी, माहुली चौकी, एस.टी. स्टॅण्ड पोलीस चौकी, येथे देखील महिला पो. हवा. अर्चना कदम, रेणुका सावंत, अश्विनी बनसोडे, निलम सुर्यवंशी, शितल सपकाळ, अर्चना सुडके, अर्चना पवार, बोराटे, पोतेकर, वाहतुक नियत्रंण कामकाज म.पो.हवा. गौरी ढाणे, राणी मोहिते यांनी पाहिलेले आहे.महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे गहाळ चोरीस गेलेले ४ लाख रुपये किंमतीचे एकूण २० मोबाईल हॅण्डसेट तक्रारदार महिलांना सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्रीमती अक्षदा इंगळे यांच्या हस्ते परत दिले आहे.सदरचा महिला दिन मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, यांचे मार्गदर्शना प्रमाणे करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट