सासु सुनेची भांडण,,सुनेने सासूचा कानच ओरबडला,, पोलीस ठाण्यात सूने विरुद्ध गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :- महाड तालुक्यातील आकले गावातील घटना..
महाड तालुक्यातील आकले येथे सुनेने सासूला मारहाण केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू संगीता संतोष साळुंखे वय 52 वर्ष यांनी पोलीस ठाण्यात दिलेले फिर्यादीनुसार सून मोबाईलवर बोलत असताना दोघींमध्ये किरकोळ वाद झाला या वादाच रूपांतर भांडणांमध्ये झाले. या भांडणामध्ये सुनेने सासूला चपलेने मारहाण केली तसेच उजवा कान ओरबटल्यामुळे कानाला मोठी दुखापत झाली त्यानंतर गळ्यातले मंगळसूत्र देखील तोडले व धक्काबुक्की करून तुम्हाला सर्वांना बघून घेईन अशी धमकी दिली.

याप्रकरणी आरोपी सून कल्याणी विवेक साळुंखे वय 23 हिच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे 118(1),115(2),352,351(2),324(4) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निलीमा गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com