सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे नांदेड सिटी पोलीसानी केले जप्त

सह संपादक- रणजित
पुणे
दि.२२/०२/२०२५ रोजी नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर व स्वप्नील मगर यांना बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार प्रज्वल भास्कर थोरात यांचे कडे एक गावठी पिस्टल असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
मिळालेल्या बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेड सिटी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून इसम नामे प्रज्वल भास्कर थोरात वय.२१ वर्षे रा. व्यंकटेश विश्व सोसायटी, मानाजीनगर न-हे, पारेकंपनी रोड पुणे याला पकडले त्याचे कडून कि.रु. ४६,०००/-रू.कि.चे एक गावठी पिस्टल मॅग्झीनसह, दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. यातील इसम नामे प्रज्वल भास्कर थोरात हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द मारामारी, हत्यार बाळगणे असे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पो.उप निरी. शिवाजी बुनगे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविण कुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि. ३ पुणे, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री गुरुदत्त मोरे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार प्रशांत काकडे, शिवाजी क्षीरसागर, स्वप्नील मगर, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांच्या पथकाने केली.