सराईत घरफोडी व मोबाईल चोरी करणारा आरोपी गुन्हे शाखा युनिट ६ कडुन जेरबंद..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
दि. २८/०२/२०२५ रोजी युनिट ६ पथकातील पो.नि. पठाण, स.पो.नि. कांबळे, पो. हवा. ७३१७ मुंढे, पो. हवा. ७८०५ कारखेले, पो. अं.८२०३ पवार, पो. अं.८१५९ ताकवणे, पो. अं.२६८८ व्यवहारे आणि चालक पो. हवा. ६८३६ तांबेकर असे वाघोली पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पो. हवा. ७३१७मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील एक आरोपी हा डी. मार्ट जवळ, लोहगाव वाघोली रोड, वाघोली, पुणे येथे उभा असल्याचे गोपनीय बातमी प्राप्त झाली.
सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पथकासह सदर ठिकाणी जावून खात्री केली असता इसम नामे राहुल वगडू शिंदे, वय ३२ वर्षे, रा. पिरांगट, पुणे हा संशयितरीत्या मो/सा सह उभा असताना मिळून आला. नमूद इसनाकडे नो/सा बाबत तसेव सदर ठिकाणी हजर असल्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊन लागला. म्हणून लागली दोन पंवांना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एकूण किंमत रु. ०६,४०,३२२/- मिळून आले. तसेच पो. अं. ८२०३ पवार यांनी नमुद आरोपीताकडे त्याचे ताब्यातील मो/सा बाबत चौकशी केली असता नमुद मो/सा ही चोरीची असल्याचे आणि त्याने आणखी एक मो/ सा चोरी केल्याची माहिती मिळून आली.
नमूद आरोपीताकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्याने सदरचे सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर पो. ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचे ताब्यातील मो/सा ही रावेत पो. ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकंदरीत तपासामध्ये खालील नमूद घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
एकूण हस्तगत मालमत्ता किं. रु. ०७,४०,३२२/- असे सदर आरोपीतांविरुद्ध पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात चोरी, घरफोडी आणि मो/सा चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, प्रभारी पो. नि. वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे, पो. हवा. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, चालक पो. हवा. सुहास तांबेकर, पो. अं. सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, यांनी केली आहे.