सराईत चैन स्नॅचर मानपाडा पोलीसाच्या जाळयात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

ठाणे :- दिनांक २०/१०/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०५ वा. चे सुमारास प्राथमिक शिक्षक श्री रवि सोन्या गवळी, वय ४२ वर्ष रा मानपाडा रोड, डोबिंवली है मॉर्निंग वॉक करत डी मार्ट समोरील रोडने जात असताना बजाज पल्सर मोटार सायकल वरील २ अनोळखी इसमांनी गवळी यांच्या गळयातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचुन त्यांना जोराचा धक्का देवुन जखमी करून पळुन गेले होते. प्राथमिक शिक्षक रवि गवळी यांनी दिलेल्या तकारीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुरजि. क्रमांक ८७० / २०२३ भा.द.वि. ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आल्यानंतर वपोनि मानपाडा पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेटी देवून गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा. वरिष्ठानी दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास चालू केला.

दिनांक २७/१०/२०२३ रोजी मानपाडा पोलीसांनी गोपनिय बातमीदाराकडुन तसेच तांत्रिक माहीती मिळविली असता सदर चैन स्नॅचिंगचे आरोपी नवी मुबंई तळोजा मार्गे डोबिंवली कडे येत असल्याचे दिसुन येताच मानपाडा पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात ३ ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसांनी त्यांना जाळयात अटकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी जड वाहने रोडवर थांबवली. त्याचा आरोपींना संशय आल्याने आरोपींनी मोटार सायकल रोडवर सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न मानपाडा पोलीसांनी हानुन पाडला
आणि दोन्ही चैन स्नॅचरला पाठलाग करून ताब्यात घेतले.

आरोपी नामे १) वारिस मिराज खान, वय २४, रा. अटाळी आंबिवली कल्याण २) मोहम्मद जाफर कुरेशी वय ३० रा. शहाड, कल्याण पूर्व यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोबिंवली परिसरात चैन स्नॅचिंगचे एकुण ८ गुन्हे व मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची पोलीसांकडे कबुली दिली आहे. या सर्व गुन्हयामध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०,०००/- हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण आणि मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अशोक होनमाने, वपोनि मानपाडा पोलीस ठाणे, यांच्या देखरेखीखाली श्री. सुरेश मदने, पोनि (प्रशा) श्री. राम चोपडे पोनि (गुन्हे) श्री. दत्तात्रय गुंड पोनि (कावसु) सपोनि / अविनाश वनवे सपोनि / सुनिल तारमळे, सपोउपनिरी/ भानुदास काटकर, पोहेकॉ / संजु मासाळ, पोहेकॉ / शिरीष पाटील, पोहेकॉ / सुनिल पवार, पोहेकॉ विकास माळी, पोहेकॉ राजेंद्र खिलारे, पोहेकॉ / दिपक गडगे, पोना / शांताराम कसबे, पोना/ यल्लप्पा पाटील, पोना/ महादेव पवार, पोकों/विजय आव्हाड, पोकों/महेंद्र मंझा, पोकों/ विनोद ढाकणे, पोकों/ अशोक अहेर, पोना/ महाजन, पोकों/ चंद्रकांत खरात, पोना / पाटील, पोकों / संदीप खरात यांचे पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट