पुणे शहरात सराईत गुन्हेगारांवर युनिट २ ने मोठी कारवाई करून ३ पिस्टल व ६ राऊड केले हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-उमेद सुतार

पुणे :- विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते. अनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनीट ०२ कडील अधिकारी व अमंलदार युनीट हददीत गस्त करीत असताना आज दिनांक ०९/११/२०२४ रोजी पोहवा. उज्वल मोकाशी, पोहवा. शंकर कुंभार यांना गुप्त बातमीरामार्फत माहिती मिळाली की, गंगाधामकडे जाणा-या रोडवरती गुलटेकडी स्वारगेट पुणे येथे दोन इसम पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर बातमी युनीट ०२ प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनीट ०२ कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनीट ०२ कडील अधिकरी व अमंलदार यांनी कारवाई केली असता आरोपी नामे १) अविनाश पोपट मोरे वय ३० वर्ष रा मेन बाजारपेठ शिरवळ पुणे २) क्षितिज भाऊसाहेब भोसले वय २० वर्ष रा.मु पो वॉटर कॉलनी ता खंडाळा जि सातारा यांचेकडे वरिल वर्णनाचे ०३ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०६ जिवंत काडतुस असा १,२२,४१०/- रु माल अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता पुण्यामध्ये घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे त्यावरुन त्यांचेवर स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमाक ४८१/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आशिष कवठेकर, युनीट ०२, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे, गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार पो हवा. उज्वल मोकाशी, पोहवा,शकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, यांनी केली आहें।

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट