सराई गुन्हेगाराकडून दुचाकी केली पोलिसांनी हस्तगत ..आरोपी जेरबंद ..

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १४ कल्याण ठाणे

कोळसेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त, परीमंडळ ३. कल्याण अतुल झेंडे यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश न्हायदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पो.स्टे. गुरनं ३७०/२०२५ भा. न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी नं. MH-04-LU-3194 व अज्ञात आरोपीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून रेकॉर्डवरील आरोपी नामे पियुष मधूकर जाधव, वय २० वर्षे, रा. अमुल निवास, रूम नं. २. ममता नर्सिंग होम, काटेमानीवली नाका, कल्याण पुर्व यास दि १३/०५/२०२५ रोजी १९:३० वाजेच्या सुमारास लोकग्राम सर्कल, कल्याण पुर्व येथे ताब्यात घेवून त्याचेकडून चोरी केलेल्या ८०,०००/- रू. किमंतीची टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कुटी हस्तगत करण्यात आली आहे. त्यास गुन्हयाचे तपास करण्याकरिता ताब्यात घेवून अटक करण्यात आली.सदरची कारवाई पोलीस उपायुक्त, परीमंडळ ३. कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वयोनिरी. गणेश न्हायदे, सपोनिरी. दर्शन पाटील, सपोनिरी. पोहवा/१५३२ मिलींद बोरसे, पो. हवा.६२५६ राजेश कापडी, पो.हवा.३११२ भागवत सौंदाणे, पो.हवा. ६५४८ भगवान सांगळे, पो.हवा.६५९६ विलास जरग, पो. हवा.३१९३ नरेश दळवी, पो शि.२६५६ दिलीप सोनावळे, पो. शि.८४१४ प्रदिप गिते यांनी केली आहे.