मिरज मध्ये मोटार सायकल चोरी करणारे परराज्यांतील सराईत आरोपी जेरबंद करून एकूण ६,५०,०००/- रु. च्या १३ मोटार सायकली केल्या हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

मिरज :– मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

गु.र.नं. २५०/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे

बसवराज भिमाप्पा बानी, रा. अलखणुर, ता. रायचाग, राज्य-
कर्नाटक.

माहिती कशी प्राप्त झाली

गु.घ.ता वेळ दि. १५.०४.२०२४ रोजीचे १०.४५ वा ते १६.०० वा चे दरम्यान

गु.दा.ता वेळ ता. २३.०४.२०२४ रोजी २०.२५ वा.

सपोफी / अनिल ऐनापुरे पोहेकों / १६४७ सचिन धोत्रे, पोशि / २५६६ सुरज थोरात, पोशि/ २२४ विनायक सुतार

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

फिर्यादी नाव
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शा, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / सचिन धोत्रे, इसान मुल्ला, अरुण पाटील, अमोल ऐदाळे, कुबेर खोत, पोना / प्रकाश पाटील, अनंत कुडाळकर, पोशि / सुरज थोरात, सुनिल जाधव, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, पोना / श्रीधर बागडी, पोशि / कॅप्टन गुंडवाडे, विवेक सांळुखे, अजय पाटील सायबर पोलीस ठाणे.

अटक वेळ दिनांक दि. २५/०४/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता श्रीरंग लॉखडे, वय २५ वर्षे, सध्या रा. अहिल्यानगर, सांगली, मुळ रा. मल्हारवाडी मंगसुळी,

१. रणजित ता. आधणी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक. २. अशोक विश्वनाथ काशीद, वय २६ वर्षे, सध्या रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर, सांगली मुळ रा. मांजरी, चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक,

उघडकीस आलेले गुन्हे

१. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. २५०/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

२. तासगाव पोलीस ठाणे गु. र. नं. १६९/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

३ .एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गु. र. नं. ११५/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

४. कवठेमहांकाळ पोलीस ठाणे गु. र. नं. २०७/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

५. सांगली शहर पोलीस ठाणे गु. र. नं. १७०/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

६. सांगली शहर पोलीस ठाणे गु. र. नं. २१४/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

७. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. २४९/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

८. कागवाड पोलीस ठाणे राज्य कर्नाटक गु. र. नं. ५१/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

९. कुडची पोलीस ठाणे राज्य कर्नाटक गु. र. नं. २०/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

जप्त मुद्देमाल

१. ३,५०,०००/- रु. किंमतीच्या ७ हिंरो होंडा कंपनीच्या स्प्लेण्डर प्लस मोटार सायकली जु. वा. किं. अं.

२. १,५०,०००/- रु. किंमतीच्या ३ हिंरो होंडा कंपनीच्या स्प्लेण्डर मोटार सायकली जु. वा. किं. अं.

३. ५०,०००/- रु. किंमतीची? हिंरो होंडा कंपनीच्या स्प्लेण्डर प्रो मोटार सायकल जु. वा. किं. अं.

४. ५. ५०,०००/- रु. किंमतीची १ होंडा कंपनीची पाढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड मोटार सायकल जु.वा.कि.अं.
५. ५०,०००/- रु. किंमतीची १ हिंरो कंपनीची एच एफ डीलक्स मोटार सायकल जु. वा.किं. अं.

६. ६,५०,०००/- (सहा लाख पन्नास हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २५/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकातील सपाफी अनिल ऐनापुरे, पोहेकों सचिन धोत्रे, पोशि/ सुरज थोरात आणि पोशि / विनायक सुतार यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तानंग फाटा
पुलाच्या खाली दोन इसम विना नंबर प्लेटची चोरीची मोटार सायकल विक्री करण्याकरीता आले आहेत. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे तानंग फाटा पुल परिसरात जावून निगराणी करत असताना, दोन इसम विना नंबर प्लेटचे मोटार सायकल जवळ रोड कडेला थांबलेले दिसले.

त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे

१) रणजित श्रीरंग लॉखडे, वय २५ वर्षे, सध्या रा. अहिल्यानगर, सांगली, मुळ रा. मल्हारवाडी मंगसुळी, ता. आधणी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक.
२) अशोक विश्वनाथ काशीद, वय २६ वर्षे, सध्या रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर, सांगली मुळ रा. मांजरी, चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, रणजित लॉखडे याने सांगितले की, त्याने व सोबत असलेला अशोक काशीद यांनी मिळून वेळोवेळी मोटार सायकली चोरी केल्या असून त्यापैकीच एक मोटार सायकल असल्याचे सांगुन इतर मोटार सायकली हया अहिल्यानगर, सांगली येथील भाड्याने राहत असलेल्या घराचे शेजारी मोकळया जागेत लावल्या असल्याचे कबूल केले. लागलीच पंचासोबत त्यांनी गाड्या ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चर नमुद वाहने तेथे मिळून आली.

सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाचत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज ग्रामीण, तासगाव, एमआयडीसी कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली शहर आणि कर्नाटक राज्यातील कागवाड व कुडची पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटार सायकली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्या. रणजित श्रीरंग लॉखडे हा रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्याचेवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट