मिरज येथे मोटार सायकल चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद ५,६०,०००/- रु. च्या १० मोटारसायकली हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज :-मिरज शहर पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. १३८/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे गु.दा.ता वेळ

गु.प.ता वेळ
दि. १९.०३.२०२४ रोजी रात्री ०२.०० वा ते पहाटे ०६.०० वा चे दरम्यान

ता. ०६.०४.२०२४ रोजी १५.१९ बा.

फिर्यादी नाच

राहुल सदाशिव सुतार, रा. सुतार गल्ली, कालिका मंदीरजवळ, मिरज.

माहिती कशी प्राप्त झाली

पोहेकों / १७३३ अरुण पाटील पोशि / २२४ विनायक सुतार पोशि / ४८८ रोहन घस्ते

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा पोलीस निरीक्षक राजेश माने, स्था. गु. अ. शा,
सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों/ अरुण पाटील, कुबेर खोत, सचिन धोत्रे, राजु शिरोळकर, नागेश कांबळे, अनंत कुडाळकर, अमर नरळे, पोना/ प्रकाश पाटील पोशि / रोहन घरते, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, सुरज थोरात, अजय बेंद्रे, पोना / श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे,स्वप्निल नायकोडे, अजित पाटील सायबर पोलीस ठाणे, अटक वेळ दिनांक दि. १०/०४/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

१. निखील महेश मागाडे, वय २४ वर्षे, रा. रजपुत मळा, अभयनगर, सांगली.

२. आवान समिर भिरती, वय २० वर्षे, रा. जुना कुपवाड रोड, सटालेमळा, राजीन नगर, सांगली.

उघडकीस आलेले गुन्हे

१. मिरज शहर पोलीस ठाणे गु. र. नं.१३८/२०२४ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

२. संजय नगर पोलीस ठाणे गु. र. नं. १८०/२०२१ भादविर्स कलम ३७९ प्रमाणे.

३. संजय नगर पोलीस ठाणे गु. र. नं. १६२/२०२३ भादविसं कलम ३७९ प्रमाणे,

४ .सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. १०१/२०२३ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

५.मिरज शहर पोलीस ठाणे गु. र. नं. ३५७/२०२३ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

६. विश्रामबाग पोलीस ठाणे गु. र. नं. १३४/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

जप्त मुद्देमाल
१. ३०,०००/- रु. किंमतीची १ बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल जु. वा. किं. अं.

२. १,५०,०००/- रु. किंमतीच्या ३ हिंरो होंडा कंपनीच्या स्प्लेण्डर मोटार सायकली जु. वा. किं. अं.
३. ७०,०००/- रु. किंमतीची होण्डा कंपनीची शाईन मोटार सायकल जु. बा. किं. अं.

४. १,००,०००/- रु. किंमतीची बजाज कंपनीची २२० सीसी पल्सर मोटार सायकल जु. वा. किं. अं.

५. ३०,०००/- रु. किंमतीची? सुझुकी कंपनीची मॅक्स १०० मोटार सायकल जु. या. किं. अं

६. ५०,०००/- रु. किंमतीची? होण्डा कंपनीची ड्रीम निओ ११० मोटार सायकल जु. वा. किं

७. ६०,०००/- रु. किंमतीची १ होण्डा कंपनीची युनीकॉर्न मोटार सायकल जु. वा. कि, अं

८. ७०,०००/- रु. किंमतीची? हिंरो कंपनीची एच एफ डीलक्स मोटार सायकल जु. वा. किं. अं.

५,६०,०००/- (पाच लाख साठ हजार रुपये)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काडुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश
दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. १०/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकातील पोहेकों / अरुण पाटील, पोशि/ विनायक सुतार व रोहन घरते यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिन्मय पार्क जवळ दोन इसम विना नंबरप्लेटची चोरीची मोटार सायकल विक्री करण्याकरीता आले आहेत.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे चिन्मय पार्क परिसरात जवून निगराणी करत असताना, दोन इसम विना नंबर प्लेटचे मोटार सायकल जवळ रोडकडेला थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) निखील महेश मागाडे, वय २४ वर्षे, रा. रजपुत मळा, अभयनगर, सांगली. २) आधान समिर भिस्ती, वय २० वर्षे, रा. जुना कुपवाड रोड, सटालेमळा, राजीन नगर, सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काचाबत विचारणा केली असता, निखील मागाडे याने सांगितले की, त्याचे सोबत असलेला आयान भिस्ती व शाहिद समिर मुल्ला दोघे रा. राजीव नगर, सांगली यांनी मिळून वेळोवेळी मोटार सायकली चोरी केल्या असून त्यापैकी त्यातील एक मोटार सायकल असल्याचे सांगुन इतर मोटार सायकली हया सहयाद्रीनगर सांगली येथे सांगली रेल्वे स्टेशनच्या गोडाऊनच्या मोकळया जागेत लावल्या असल्याचे कबूल केले. लागलीच पंचासोबत त्यांनी गाड्या ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता वर नमुद वाहने तेथे मिळून आली.

सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाबत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज शहर, संजयनगर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटार सायकली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्या. आयान समिर भिरती हा रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्याचेवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन, पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट