संतोष कदम याच्या तोंडावर चाकूने वार करून खुन करणार्या फरारी आरोपीस सांगली पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन कुरुंदवाड पोलीस ठाणे, कोल्हापुर
अपराध क्र आणि कलम
मु.र.नं. ५५/२०२४ भादविसं कलम ३०२, ३६५, १२० (ब), ३४ प्रमाणे
प्रफुल्ल प्रकाश कदम, रा. गावभाग, हरिपुर रोड, प्रशिक चौक, सांगली.
गु.घ.ता वेळ दि. ०७/०२/२०२४ रोजी सायंकाळी १५.०० वा ते १९.३० वा दरम्यान
गु. दा. ता वेळ ता. ०८/०२/२०२४ रोजी २१.१२ वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों/ दिपक गायकवाड, संजयनगर पोलीस ठाणे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर श्री. सुनिल फुलारी मा. पोलीस अधीक्षक संदीप चुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गू. अ. शाखा,
सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकों/ दिपक गायकवाड, संजयनगर पोलीस ठाणे. पोहेकों/ चिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिचा बंडगर, अरुण पाटील, पोना / संदीप नलावडे,पोशि/ विनायक सुतार, स्था.गु.अ.साखा.
अटक वेळ दिनांक दि. १२/०६/२०२४ रोजी
पाहिजे आरोपीचे नांव पत्ता
सिध्दार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर, रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी, सांगली.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. ०७/०२/२०२४ रोजी मयत इसम नामे संतोष कदम यांना ठार मारण्याचे उद्देशाने काही अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेवून त्याचेवर चाकूने तोंडावर, मानेवर, छातीवर व दोन्ही हातावर गंभीर जखमा करून त्याचा खुन फेला तसेच त्याचा मृतदेह हा स्वीफ्टकारमध्ये नांदणी ते कुरुंदवाड रोडवरील गॅस गोडावून जवळ मिळून आला होता. सदर बाचत कुरुंदवाड पोलीस ठाणे, कोल्हापुर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. ०७/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेपासून आजपर्यंत नमुद आरोपी हा पोलीसांना गुंगारा देवून अद्यापपर्यंत फरार होता. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचे सांगली जिल्हा भेटीदरम्यान नमुद गुन्हयाचे फिर्यादी व मयताचे नातेवाईक यांनी त्यांची भेट घेवून आरोपीताना लवकरात लवकर अटक करणेबाबत विनती केली होती.
सदर गुन्हा संवेदनशिल असलेने त्याचे गांभीर्य ओळखुन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर श्री. सुनिल फुलारी सर यांनी कोल्हापुर व सांगली मधील संबधित पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावून सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत आदेशीत करुन त्यावाचत वेळोवेळी
आढावा घेवून मार्गदर्शन केले होते.
मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाचत आदेशित केले हौले.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पयार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदर पाहिजे आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोहेकों / दिपक गायकवाड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत कुरुंदवाड येथील वरील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर, रा सांगलीवाडी हा कागल येथे असल्याची खात्रीसिर बातमी मिळाली.
मा. वरीष्ठांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेणेकरीता कागल पोलीस ठाणेस हजर होवून तेथील मदत घेवून मिळाले बातमीप्रमाणे फागल मध्ये सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता, तो नमुद पोलीस पथकास कागलमध्ये मिळून आला.
लागलीच सदर आरोपीस ताब्यात घेवून कागल पोलीस ठाणेस माहिती देवून सदर आरोपीस पुढील तपास कामी गुन्हयाचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे, इचलकरंजी, जि. कोल्हापुर यांचे ताब्यात दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com