सांताक्रूझ येथे जागृती गृहनिर्माण संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा..!

!प्रतिनिधी- जितेंद्र शिंदे
सांताक्रूझ:रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी वाकोला सांताक्रूझ पुर्व येथील जागरूती गृह निर्माण संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ नागरिक श्रीमती अरुणा महामूलकर यांचा हस्ते झेंडावंदन करण्यात आले.







