संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने हिसकावुन चोरी करणा-या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला गुन्हे शाखेकडुन केले जेरबंद

0
WhatsApp Image 2025-06-25 at 7.08.34 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२५ मध्ये वारकरी व नागरिकांची दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे व चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली होती. त्याबाबत वरिष्ठांनी योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.

सुचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ या पथकाने पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण हे त्यांचे स्टाफ सह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या बातमीवरुन अभिलेखावरील महिला आरोपी नामे १) चांदणी शक्ती कांबळे, वय ३२ वर्षे, रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर २) रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे, वय. ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर ३) बबीता सुरज उपाध्ये, वय ५७ वर्षे, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ४) पुजा धिरज कांबळे, वय. ३५ वर्षे, रा. भदाडे चौक, गांधीनगर उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ५) गणेश विलास जाधव, वय. ३० वर्षे, रा. बुशननगर झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ, सोलापुर मुळ रा. मु. पो. ब्यागळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे मिनी गंठण व सोन्याचे मंगळसुत्र असे एकुण १९,४१,३१०/- रु.कि.चे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करणेत आलेले असुन त्यांचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९७/२०२५ मा.न्या.सं.क. ३०४(२) व २) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ मा.न्या.सं.क. ३०३(२) हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

तसेच पालखी सोहळा दरम्यान आरोपी नामे अरबाज नौशाद शेख, वय. १९ वर्षे, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगंज, झारखंड व एका विधी संघर्षीत बालकास वय १७ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास करुन त्यांचे ताब्यातुन ४,५०,०००/- रु. किं.चे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९५/२०२५ मा.न्या.सं.क. ३०३ (२). २) हडपसर

गु.र.नं. ५९६/२०५ भा.न्या.सं.क. ३०३ (२), ३) वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २७४/२०२५ मा.न्या.सं.क.३०३(२) असे एकुण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकांचा व सोन्याचे दागिन्यांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. अशा प्रकारे गुन्हे शाखा पथकाकडुन सोन्याचे दागिने व मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २३,९१,१३०/-रुकिं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

पालखी सोहळा दरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधणेबाबत पोलीसांकडुन आवाहन करणेत आलेले आहे.

तसेच दि २०/०६/२०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे शाखेने एकुण २५ संशयितांना ताब्यात घेवुन त्यापैकी १८ संशयितांवर भा.न्या.सं.क. १२८ प्रमाणे कारवाई केली असुन उर्वरित ०७ विधीसंर्षित बालक असल्याने त्यांना संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ व युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे, सपोनि मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे व जावेद शेख यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट