सानपाडा रेल्वे स्टेशनला हरवलेली 4 वर्षाची मुलगी वाशी पोलीसांनी दिली पालकांच्या ताब्यात….

प्रतिनिधी- श्रुतिका कदम
वाशी :– दिनांक 5 जुन 2023 रोजी एक 4 वर्षाची चिमुकली सानपाडा रेल्वे स्टेशनला धायमोकळुन रडत असताना आढळून आली.


घाबरलेल्या चिमुकलीला आपला नाव पत्ता सांगता येत नसल्यामुळे आणि प्रवाशांनी तीची विचारपुस करण्यासाठी गर्दी केल्यामुळे ती बावरून गेली होती. परंतु तेथे ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या पत्रकार कु.श्रुतिका कदम यांनी तिला वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेऊन जावुन तिच्या बाबतीत अधिक तपास करून तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप स्वाधीन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com