म्हाडा मध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने बनावट पेपर देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणारा ठग संजय प्रजापती अखेर दहिसर पोलीसांच्या ताब्यात…

0
Spread the love

संपादक-दिप्ती भोगल

मुंबई:-श्रीमती शर्मिला राजेश गोहील, गृहिणी, रहाणार अशोकवन, बोरीवली पुर्व, मुंबई यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ती वरील नमुद पत्यावर 8 वर्षापासून कुटुंबीयांसह राहते.

ती गृहिणी असुुन तीेचे पती लेडीज टेलर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबीयाचा उदरनिर्वाह चालतो.

                        तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सन 2015 मध्ये तीच्या पतीचे मित्र दिनेश जेठवा यांचे मध्यस्थीने आमची ओळख श्री. संजय अमृतलाल प्रजापती यांचेशी झाली होती. डिसेंबर 2015 मध्ये संजय प्रजापती, राकेश मोरे, भानू गुप्ता असे आमच्या वर नमूद घरी आले. संजय प्रजापतीचे 2 मित्र राकेश मोरे व भानू गुप्ता यांनी आम्हाला संजय प्रजापतीची म्हाडा कार्यालयात चांगली ओळख असून तुम्हाला म्हाडाची रूम नक्की मिळवून देणार असे सांगितले. त्यांनी आम्हाला अशोकवन, बोरीवली पुर्व, मुंबई येथील महानगरपालिका संकेत क्रमांक 222/एम.आय.जी. योजनेतील सदनिका क्र. 603, इमारत क्र. 5, एकूण चटई क्षेत्र 370 चौफूट असलेली सदनिका आम्हाला दाखवून सदरची सदनिका म्हाडामध्ये सेटींग लावून मिळवून देतो असे सांगितले. त्यांनी मला व माझे पतींना इमारत क्रमांक 5 च्या, पाचव्या माळ्यावर घेवून जावून रूम दाखविल्या परंतु सदरच्या खोल्या बंद होत्या. संजय प्रजापतीने आम्हाला सदनिकेची किंमत 12,05,000/- रूपये व स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे 80,000/- रूपये सांगून सर्व पैसे रोख द्यावे लागतील तसेच रूम मिळाल्यानंतर 5 लाख रूपये कमिशन म्हणून द्यावे लागतील असे सांगितले.

सदरची सदनिका मिळण्यासाठी संजय प्रजापतीने आम्हाला म्हाडाचा अर्ज क्रमांक 1010006419 प्रवर्ग जी.पी. प्राधान्य क्रमांक 42 अन्वये भरण्यास सांगितले. सदरच्या संपुर्ण व्यवहारासाठी एकूण 17,00,000/- रूपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरून संजय प्रजापतीकडे दिला.

                        दिनांक 16/12/2015 रोजी संजय प्रजापती, राकेश मोरे व भानू गुप्ता यांनी मला व माझे पतींना म्हाडा कार्यालय, कलानगर, बांद्रा, मुंबई येथे घेवून गेले. संजय प्रजापतीने आम्हाला 'कुलकर्णी' नावाच्या अनोळखी व्यक्तीशी म्हाडाचे अधिकारी म्हणून भेटवून सदरचे अधिकारी हे आपले काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय प्रजापतीने आम्हाला पैसे देण्यास सांगितल्याने आम्ही संजय प्रजापतीला 3,20,000/- रूपये रोख स्वरूपात दिले. सदरबाबत संजयने दुसऱ्या दिवशी आम्हाला अॅक्सीस बॅकेमध्ये 3,01,250/- रूपये रोख माझे नावे भरल्याची परंतु त्यावर 'मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबई, (मिळकत व्यवस्थापक)' असा शिक्का असा गोल शिक्का व सही असलेली दिनांक 31/05/2009 रोजीची रिसीप्ट आणून दिली.

त्यानंतर त्यांनी आमच्या दुकानामध्ये येवून 7,83,250/- रूपये माझेकडून घेतले. सदरचे पैसे म्हाडामध्ये भरल्याबाबत वरीलप्रमाणेच दिनांक 18/06/2009 रोजीची रिसीप्ट मला आणून दिली. त्यानंतर संजय प्रजापतीने माझेकडून उर्वरीत 1,20,000/- रूपये माझे घरी येवून घेला गेला त्यासाठीसुध्दा वरीलप्रमाणे दिनांक 27/06/2009 रोजीची रिसीप्ट आम्हाला आणून दिली. सदरच्या रिसीप्टवर सन 2009 मधील तारखा असल्याबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता सदरचा प्रकल्प हा जुना असल्याने तेंव्हाच पैसे भरल्याबाबत पावत्या घ्याव्या लागतात असे सांगितले.

                साधारण जानेवारी 2016 मध्ये संजय प्रजापती यांनी माझे नावाचे म्हाडाचे लेटरहेडवर असलेले 'देकार पत्र' (ऑफर लेटर) आणून दिले. त्यावर माझे नावाने संकेत क्रमांक 222/एम. आय. जी. योजनेतील सदनिका क्र. 603,इमारत क्र. 5, एकूण चटई क्षेत्र 370 चौफूट असलेली सदनिका मला मिळाली असल्याबाबत देकार पत्र होते.

सदरच्या देकार पत्रावर म्हाडाचा गोल सिक्का व सही आहे. सदरच्या देकार पत्रावरून आम्ही रूमचा ताबा घेण्यासाठी नमूद बिल्डींगमध्ये गेलो असता तेथील लोकांनी सदरचे ‘देकार पत्र’ हे खोटे असल्याचे सांगितले. आम्ही देकार पत्राबाबत म्हाडा कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी माझे नावे कोणतेही देकार पत्र म्हाडा कार्यालयातून देण्यात आले नसल्याचे तसेच आमच्याकडील देकार पत्र खोटे असल्याचे सांगितले.

आम्ही सदरबाबत संजय प्रजापतीला सांगितल्यावर त्याने देकारपत्र माझेकडून परत घेतले परंतु मी सदरच्या पत्राचे फोटो मोबाईलमध्ये घेतले होते. (त्याची छायांकित प्रत मी सादर करीत आहे.)

            त्यानंतर आम्ही संजय प्रजापतींना आमचे पैसे परत करण्याची विनंती केली असता त्यांनी मला म्हाडा कॉम्पलेक्स, पद्मानगर, चिकूवाडी, शिंपोली, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे म्हाडाचा नवीन प्रकल्प सुरू असून सदरच्या प्रकल्पात मला रूम देतो असे संजय प्रजापती, राकेश मोरे व भानू गुप्ता यांनी सांगितले. आम्हाला घराची आवश्यकता असल्याने तसेच आमचे पैसे अडकले असल्याने आम्ही शिंपोलीला रूम दिली तरी चालेल असे सांगितले. सदरच्या प्रकल्पातील खोलीची किंमत 19,00,000/- रूपये असून त्यासाठी माझेकडून 2,00,000/- रूपये रोख घेवून गेले.

त्यानंतर संजय प्रजापतीला शिंपोलीच्या रूमचा ताबा देण्यास सांगितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली. संजय प्रजापती याने मला शिंपोली येथील रूमचे सुध्दा म्हाडाच्या लेटरहेडवरील ‘ताबापत्र’ दिले असून त्यावर माझी व माझे पतीच्या सह्या घेतलेल्या आहेत. सदरच्या ताबापत्रामध्ये संकेत क्रमांक 267 अ/अ, अर्ज क्रमांक 1010006419, प्रवर्ग- जी.पी., प्राधान्य क्रमांक 47, इमारत ई विंग, सदनिका क्र. 1003 ही सदनिका माझे नावाने झाल्याबाबत ताबापत्र मला दिले. आम्ही सदरचे पत्र घेवून रूमचा ताबा घेण्यासाठी गेलो असता तेथे आम्हाला सदरचे पत्र हे खोटे असल्याचे समजले. आम्ही सदरबाबत म्हाडाच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता माझे नावाने कोणतेही पत्र म्हाडामधून देण्यात आले नसल्याचे तसेच आमच्याकडील पत्र हे खोटे व बनावट असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरबाबत आम्ही संजय प्रजापतीला सांगितल्यावर त्याने आम्हाला मागाठाणे येथील म्हाडाच्या प्रकल्पात रूम देतो असे सांगितले. राकेश मोरे याने आम्हाला मागाठाणे येथील म्हाडाच्या एका बिल्डींगमध्ये घेवून जावून दुसऱ्या माळ्यावरील एक खोली दाखवली होती.

                          परंतु ते आम्हाला सारखे फिरवा फिरवी करू लागल्याने आम्ही संजय प्रजापती, राकेश मोरे व भानू गुमा यांना आम्ही दिलेले एकूण 14,85,000/- रूपये परत करण्यास सांगितले असता संजय प्रजापती याने मला आत्तापर्यंत फक्त 3,00,000/- रूपये परत केलेले आहेत परंतु उर्वरीत 11,85,000/- रूपये मला परत केलेले नाहीत. संजय प्रजापतीने त्याचे अँक्सिस बँकेचा खाते क्र. 914010049307310 या खात्याचा 2 लाख रूपयेचा चेक क्रमांक 086094 चा चेक दिला होता सदरचा चेक बाउंस झाला आहे. त्यानंतर गोंड भोलानाथ बेचन यांचे नावाचा सारस्वत बँकेचा खाते क्र. 055203100001693 या खात्याचा 4,75,000/- रूपयेचा चेक दिला होता सदरचा चेक बाउंस झाला आहे. तसेच झवेरीचंद केशवजी लोडाया यांचे नावाचा अरिहंत बँकेचा 001001009544 या खात्याचा 2,00,000/- रू. चा चेक दिला होता सदरचा चेक बाउंस झालेला आहे. तसेच संजय प्रजापती याने त्याचे वर नमूद अॅक्सिस बँकेचे 1)6,50,000/- रू.2) 5,00,000/- रू. व बँक ऑफ बडोदा चा 15,00,000/- रू चे चेक दिलेले आहेत. परंतु त्यांचे चेक वारंवार बाउंस होत असल्याने ते बँकेमध्ये जमा केले नाहीत. सदच्या चेकच्या छायांकित प्रती मी तपासकामी देत आहे.

              मी चौकशीकामी 1) मी पैसे दिल्यानंतर मला म्हाडामध्ये पैसे भरल्याबाबत देण्यात आलेल्या बनावट व खोट्या रिसीप्ट, 2) बोरीवली येथील रूम माझे नावावर मंजूर झाल्याबाबत म्हाडाच्या लेटरहेडवरील बनावट व खोटे देकार पत्र, 3) शिंपोली येथील रूम माझे नावावर झाल्याबाबत म्हाडाच्या लेटरहेवरील बनावट व खोटे 'ताबापत्र', 4) मला संजय प्रजापती यांनी दिलेल्या परंतु बाउंस झालेल्या चेकच्या छायांकित प्रती इत्यादी कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करीत आहे.

                         तरी डिसेंबर 2015 पासून ते अद्यापपर्यंत संजय अमृतलाल प्रजापती, राकेश मोरे व भानू गुप्ता यांनी संगनमताने मला अषोकवन, बोरीवली पूर्व, मुंबई येथील महानगरपालिका संकेत क्रमांक 222/एम.आय.जी. योजनेतील इमार क्र. 5, सदनिका क्र. 603 ही म्हाडा मधून मिळवून देतो असे सांगून माझा विश्वास संपादन करून माझी फसवणूक करून आमच्याकडून एकूण 14,85,000/- रूपये घेवून मला सदरचे पैसे म्हाडामध्ये भरले असल्याबाबत म्हाडाचा शिक्का व सही असलेल्या खोट्या रिसीप्ट दिल्या. तसेच म्हाडाच्या लेटरहेडवर म्हाडाचा शिक्का असलेले बनावट व खोटे 'देकार पत्र' व 'ताबापत्र' आम्हाला आणून देवून आम्हाला घर न देता आमची फसवणूक केली. माझेकडून 14,85,000/- रूपये घेवून त्यापैकी 11,85,000/- रूपये मला परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून माझे पैशांचा अपहार करून फसवणूक केली म्हणून माझी संजय अमृतलाल प्रजापती, राकेश मोरे व भानू गुप्ता याचेविरूध्द कायदेशीर तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दाखल केली.

दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गहिनीनाथ फड यांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०,४०६,४६५,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपींला वसई येथुन ताब्यात घेतले असून या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गहिनीनाथ फड करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट