मंडणगड मॅरेथॉन स्पर्धेत पंदेरी हायस्कूलच्या सानिका कोबनाक वर होतोय कौतुकांचा वर्षाव..

0
Spread the love

मंडणगड

;संपादिका – दिप्ती भोगल शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मंडणगड तालुक्यात मैत्री फाऊंडेशन व एस एस कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत अनवाणी भाग घेणाऱ्या पाटील वाडीतील पंदेरी हायस्कूलच्या इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या कुमारी सानिका कोबनाक हिने आश्चर्याचा धक्का देत मातब्बर खेळाडूंवर मात करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवल्याबाबत तिच्यावर विशेष कौतुकांचा वर्षाव होत आहे. या ३ किलोमीटरच्या स्पर्धेत ती अनवाणी धावत असताना देखील बराच काळ १ नंबरवर होती परंतू अनवाणी धावताना तीला रोडवरील खडे टोचल्यामुळे तीला वेदना असाहय झाल्यामुळे ती थोडी थांबली असता मातब्बर खेळाडूंनी गैरफायदा घेत तीच्या पुढे भरारी घेतली. परंतु हार न मानता पुन्हा एकदा सानिकाने मैदानात उतरून जिद्दीने विजयश्री अक्षरशः खेचून आणला. यावेळी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून तीला सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तीच्या या अति उल्लेखनीय यशाबद्दल संस्था, शालेय समिती , शिक्षक वर्ग, कर्मचारी, पालक , प्रेक्षकवर्ग व ग्रामस्थ यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. यावेळी तीला हायस्कूलचे इंगळे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट