सांगोला पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी – २४ तासांत गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपी अटक

प्रतिनिधी: उमेश वाघमारे
सोलापूर

सांगोला पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी – २४ तासांत गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपी अटकेत
सांगोला तालुक्यातील आचकदाणी येथील रहिवासी फिर्यादी सलिम दादा मुजावर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या २४ तासांत सांगोला पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत आरोपीस अटक करून चोरीस गेलेला सुमारे ₹3.30 लाखांचा मुद्देमाल (षेळ्या) हस्तगत केला आहे.
फिर्यादी यांनी त्यांच्या कडे काम करणारा मजूर मो. नजिर शेख (रा. बिहार) याच्यावर संशय व्यक्त केला होता. तो दिनांक 15/07/2025 रोजी सकाळी 11 वाजता शेळ्यांना चारा चारण्यासाठी शेडमधून घेऊन गेला होता, मात्र संध्याकाळी परत न आल्यामुळे व त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यानेच शेळ्या चोरी केल्याचा ठाम संशय फिर्यादीस आला.
त्यावरुन फिर्यादीने सांगोला पोलीस ठाण्यात दिनांक 16/07/2025 रोजी रात्री 01:00 वा. रोजी गुन्हा दाखल केला.
गुन्हा क्र.: 582/2025, भा.दं.वि. कलम 306 अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील:
क्रमांक मुद्देमालाचे वर्णन अंदाजे किंमत
1 काळ्या, पांढऱ्या, लाल रंगाच्या मोठ्या शेळ्या (वय अंदाजे ३ वर्षे) ₹3,00,000/-
2 ५ काळ्या व पांढऱ्या रंगाची पाटरं (वय २.५ महिने) ₹15,000/-
3 १ पांढऱ्या रंगाचा बोकड (वय ८ महिने) ₹15,000/-
एकूण किंमत ₹3,30,000/-
सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याने तात्काळ तपासकार्य हाती घेतले. तांत्रिक विश्लेषण व सायबर शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेला सर्व मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर
पोलीस उपाधीक्षक श्री. विक्रांत गायकवाड
पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे
कार्यवाहीत पुढील अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता:
पो. हवा. बिपिनचंद्र ढेरे
पो. हवा. नवनाथ माने
पो. शि. शहाजहान शेख
सायबर शाखा: पो. हवा. जुबेर तांबोळी
सांगोला पोलिसांच्या या तत्पर, तांत्रिक व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे.