सांगलीत नवीन कायदेविषयक, महिला सुरक्षा, निर्भया पथक व स्वसंरक्षणार्थ विशेष मार्गदर्शन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नविन कायदेविषय मार्गदर्शन, चित्रप्रदर्शन कार्यक्रम तसेच महिला सुरक्षा, निर्भया पथक कामकाज, स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे अध्यक्षतेखाली दि. ३०.०८.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते १७.०० वा. पर्यंत पोलीस अधीक्षक यांचे मार्फतीने एम.टी.एस स्कुल, मनपा शाळा नं २३, मिरज हायस्कुल मिरज, मालु हायस्कुल सांगली, ए. बी. पाटील, आप्पासाहेब बिरनाळे स्कुल या शाळेतील ६२५ विदयार्थी- विदयार्थीनी, शिक्षक स्टाफ यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे नवीन कायदे, चित्रप्रदर्शन कायदेविषय ज्ञान, गुड टच बैंड टच, सायचर गुन्हयांविषयी माहिती, निर्भया पथक कामकाज तसेच निर्भया पथकाचे मोबाईल नंबर, महिला व अल्पवयीन बालकांविषयी कायदयाचे मार्गदर्शन, स्वसंरक्षण तसेच पिडीत मुलींनी निसंकोचपणे तक्रार देणेकरिता तसेच सदर पिडीतेचे नाव गोपनीय ठेवत असलेबाबतची माहिती देण्यात आली. तसेच डायल ११२ कॉल चे कामकाज व योग्य वापर याविषयी माहिती तसेच सांगली निर्भया पथक प्रमुख मपोउपनि मोनाली पाटील मो.नं ९३०७५११०१८, मिरज निर्भया पथक प्रमुख मिनाक्षी माळी मो.नं ९३०७५०१९०७, इस्लामपूर निर्भया पथक प्रमुख पोउपनि गायकवाड ९३०७५२०३००, तासगाव निर्भया पथक प्रमुख पोउपनि घोरपडे मो. नं ९३०७५००३४८, विटा निर्भया पथक प्रमुख मपोउपनि पुजा महाजन ९३०७६८२८४४, जत निर्भया पथक प्रमुख मपोउपनि नारायणकर ७४९८२८२८८३ या सांगली जिल्हयातील सर्व उपविभागातील मोबाईल नंबर वर कॉल करून तक्रारी देणेचे आवाहन करण्यात आले. तसेच वरील विषयांचे अनुषंगाने मार्गदर्शन महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार नेमणुक महिला कक्ष, सांगली यांनी केले.

सदर कार्यक्रमांकरीता मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर, पोलीस उपअधीक्षक, (गृह) दादासाहेब चुडाप्पा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस निरीक्षक सतिष शिंदे, सांगली निर्भया पथक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुतळे तसेच महिला कक्षकडील सर्व स्टाफ कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या मुली व महिलांचे अनुषंगाने घडत असलेल्या वेगवेगळ्या गुन्हयांचे पार्श्वभुमीवर सांगली पोलीस दलाकडून घेण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक शिक्षक च विदयार्थी विदयार्थीनी कडुन करण्यात आले. तसेच सर्व विदयार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट