सांगलीत मोटार सायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद करून १,१०,०००/- रु. च्या २ मोटार केल्या हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सांगली :-संजय नगर पोलीस ठाणे

फिर्यादी नाव

गु.र.नं. १/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे

गु.घ.ता वेळ

दि. १.०१.२०२४ रोजीचे २१.३५ या ते दि. ०२.१.२०२४ रोजीचे ०६.३५ वा चे दरम्यान

ता. ०४.०१.२०२४ रोजी १८.०९ वा.

माहिती कशी प्राप्त झाली

पोशि / १३४ अजय बंदरे

अटक वेळ दिनांक दि. २४/०४/२०२४ रोजी

१. अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने, वय २५ वर्षे, रा. एस.टी. स्टॅण्डजवळ, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ,

२. श्रेयस गुरुसिध्द बुरूड, वय १८ वर्षे, रा. चव्हाण प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज.

आरोपीचे नांव पत्ता

३. बालअपचारी

उघडकीस आलेले गुन्हे

१. संजय नगर प्पोलीस ठाणे गु. र. नं. १३८/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

२. वडगाव पोलीस ठाणे जि. कोल्हापुर गु. र. नं. ३८७/२०२२ भादविसं कलम ३७९ प्रमाणे.

जप्त मुद्देमाल १. १,१०,०००/- रु. किंमतीच्या २ हिंरो होंडा कंपनीच्या स्प्लेण्डर मोटार सायकली जु. वा. किं. अं.

१,१०,०००/- (एक लाख दहा हजार रुपये)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २४/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोशि / अजय बेंदरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सांगली ते धामणी जाणारे रोडवर ग्रिन एकर्स कॉलनीसमोर तीन इसम विना नंबरप्लेटच्या दोन चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्याकरीता आले आहेत.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, सांगली ते धामणी जाणारे रोडवर ग्रिन एकर्स कॉलनीसमोरील परिसरात जावून निगराणी करत असताना, तीन इसम विना नंबर प्लेटच्या २ मोटार सायकलीजवळ रोडकडेला थांचलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे

१) अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने, वय २५ वर्षे, रा. एस.टी. स्टैण्डजवळ, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ,

२) श्रेयस गुरूसिध्द बुरुड, वय १८ वर्षे, रा. चव्हाण प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज

३) बालअपचारी असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्कावाचत विचारणा केली असता, श्रेयस बुरुड याने सांगितले की, त्याचे सोबत असले बालअपचारी यांनी मिळून हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेजसमोरुन एक मोटार सायकल चोरी केली होती ती असून अनिकेत माने यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल याचत विचारणा केली असता त्यांने सांगितले की, सदरची मोटार सायकल ही त्याचा मित्र सदांनद उर्फ नण्या माने, रा कुपवाड याने चोरी केलेली असून ती त्याला वापरण्यास दिली असल्याचे कबूल केले.

सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाचत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता संजयनगर आणि वडगाव पोलीस ठाणे, जि. कोल्हापुर येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटार सायकली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केल्या.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आला असुन, पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट