सांगलीत अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला ५ महिन्याची गरोदर ठेवणारा आरोपी वैभव लोंढे यांस सक्षम कारावास व दंडाची शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-इस्लामपूर पोलिस ठाणे अंतर्गत दाखल फिर्यादीनुसार आरोपीत मजकुर वैभव नंदकुमार लोंढे वय २४ वर्षे रा. बोरगाव, ता. वाळवा याने अल्पवयीन पिडित मुलीस फोन करुन मार्केट यार्ड इस्लामपूर या ठिकाणी बोलावुन घेवुन तिस जबरदस्तीने गाडीवर बसवुन, तुझेसोबत मला लग्न करावयाचे आहे, तु माझेसोबत लग्न केले नाही तर मी तुझी बदनामी करीन व तुझे आईला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवुन, तिला बोरगाव या ठिकाणी त्याचे राहते घरी घेवुन जावुन तिच्या गळयात हार घालुन लग्न करण्याचा बहाणा करुन जबरदस्तीने तिच्यावरती आरोपीने वारंवार जबरदस्तीने शरिरसंबंध करुन, तिला पाच महिन्यांची गरोदर केली आहे.

सदर आरोपी नामे वैभव लोंढे याचेवर भादंविस कलम ३६३, ३७६, ३२३, ५०४, ५०६ व पोक्सो कलम ४, ५एल, ५जे, ६ प्रमाणे अपराध केलेचे तोहमत आहे.

सदर खटल्याची सुनावणी श्री. ए. एस. गांधी मे. जिल्हा न्यायाधीश क. १ इस्लामपूर यांचे कोर्टात होवून सदर खटल्याची गुणदोषावर सुनावणी होवून आरोपी यास पोक्सो कायदा कलम ६ मध्ये दोषी धरून आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व ५०००/- रुपये दंड व दंड न भरलेस ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावणेत आली. सरकार पक्षातर्फे बाजु मांडण्याचे काम सहायक सरकारी वकील श्री. रणजित एस. पाटील यांनी पाहिले.

सदर कामी सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदारांची साक्ष नोंदविणेत आली. यापैकी फिर्यादी, पिडित, पंच, व तपासी अंमलदार श्री. ज्ञानदेव वाघ सहायक पोलिस निरिक्षक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सदर खटल्याचे कामी पैरवी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक श्री. चंद्रकांत शितोळे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. सुनिल पाटील व इतर स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट