सांगलीत हँग ऑन कॅफेचे मालक अनिकेत घाडगे यांस विश्रामबाग पोलीसांकडून अटक…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सांगली :– विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. १७३/२०२४ भादविसं कलम ३५४ (ड), ३२८, ३७६(२) (जे), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा हा १०० फुटी रोड, सांगली येथील हंग ऑन कॅफेमध्ये घडलेला आहे.

सदर कॅफेचे चालक अनिकेत प्रताप घाडगे, व्यवसाय कैफे चालक, रा. अशोक स्फुर्ती बंगला, रामकृष्ण परंमहंस सोसायटी, १०० फुटी रोड, सांगली याने त्याचे हैंग ऑन कॅफेमध्ये अपराध करणेकरीता सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्यास दिसू नयेत याकरीता पडदे लावून गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून सहाय्य केले म्हणून त्यास सदर गुन्हयात आरोपी करण्यात आले असून त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी आज रोजी अटक करण्यात आलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडून आवाहन करण्यात येते की, सांगली जिल्हयात अशा प्रकारे कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम, आडोसा निर्माण करून अपराध करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कैफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून याबाबत सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.

अशा कॅफेमध्ये अवैध बांधकाम, आडोसा करण्यात येवू नये यासाठी महानगरपालीकेला कळविण्यात आले असून यासाठी आवश्यकतेप्रमाणे पोलीसांची मदत घेवुन अशा कॅफेची तपासणी करण्यात येत आहे.

कॅफेमध्ये अशाप्रकारचे गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आलेस तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट