सांगलीत 10 घरफोड्या करणाऱ्या 2 आरोपीना अटक करून 8,65 ,200 /- चा मुद्देमाल हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली : – १) उमदी पोलीस ठाणे गुरनं ३२ / २०२२ भादविस कलम ४५४,४५७,३८०
२) उमदी पोलीस ठाणे गुरनं ७८/२०२२ भादविस कलम ४५४,४५७,३८०
३) उमदी पोलीस ठाणे गुरनं ३१०/२०२२ भादविस कलम ४५४,३८०
४) जत पोलीस ठाणे गुरनं ६३१ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०
५) जत पोलीस ठाणे गुरनं ७५७ / २०२२ भादविस कलम ४५७,३८० ६) जत पोलीस ठाणे गुरनं १५१ / २०२२ भादवि कलम ४५७, ३८०
७) जत पोलीस ठाणे गुरनं १५२ / २०२२ भादवि
८) जत पोलीस ठाणे गुरनं १७७ / २०२२ भादवि
कलम ४५७,३८०
कलम ४५७,३८०
९) जत पोलीस ठाणे गुरनं ५२६ / २०२२ भादविस कलम ४५७,३८०
१०) कवठेमहंकाळ पोलीस ठाणे गुरनं १७६ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०
सांगली जिल्हयातील घरफोडीच्या गुन्हयांबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर व अंमलदार यांचे एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले.

नमुद पथकाने जत विभागात घरफोडी करणारे आरोपी यांचेवर लक्ष केंद्रीत करुन आरोपींची माहिती घेत असताना पोहेकॉ / राजु शिरोळकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे किशन चव्हाण व सुरेश चव्हाण हे दोघे चोरी केलेले सोन्याचे दागिने सोलापुर येथे विक्री करीता घेऊन जाण्यासाठी जत ते उमदी जाणारे रोडलगत, सिध्दार्थ पब्लिक स्कुल जवळ वाहनाची वाट पाहत थांबले आहेत अशी माहिती मिळाली.

मिळाले माहिती प्रमाणे वरील पथकाने सदर ठिकाणी सापळा लावुन त्या दोघांना सपोनि संदीप शिदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर व अमंलदार यांनी चौकशी कामी ताबेत | घेऊन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे
१) किशन ऊर्फ कल्लाप्पा ऊर्फ फांग-या रतन चव्हाण वय २४ रा, उमराणी रोड, पारधी तांडा, जत, ता. जत जि सांगली
२ ) सुरेश तुळशीराम चव्हाण वय २९ रा, पारधी तांडा, कुंभारी ता. जत जि सांगली अशी सागितली. त्यावेळी सपोनि संदीप शिदे यांनी पंचासमक्ष किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण व सुरेश तुळशीराम चव्हाण यांची अंगझडती घेतली असता, किशन ऊर्फ कल्लाप्पा याचे पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, सोन्याचे गंठण, लहान सोन्याच्या अंगठया मिळाल्या तसेच सुरेश चव्हाण याचे अंगझडती मध्ये पॅन्टच्या खिशात सोन्याचे कानातील टॉप्स एक जोड, दोन अंगठया मिळाल्या. मिळाले सोन्या चांदीच्या दागिने बाबत दोघांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले, त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी त्यांचे कब्जात मिळाले सोन्याचे दागिने बाबत जत पोलीस ठाणे व कवठे महांकाळ पोलीस ठाणे येथे माहिती घेतली असता, सदर दागिने चोरीस गेले बाबत
१) जत | पोलीस ठाणे गुरनं ६६१ / २०२२ भादवि कलम ४५७, ३८०
२ ) जत पोलीस ठाणे गुरनं ७५७/२०२२ भादवि कलम ४५७, ३८३
३) कवठेमहंकाळ पोलीस ठाणे गुरनं १७६/२०२२ भादविस कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली.
त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष त्याचे कब्जातील चोरीसे गेले सोन्याचे दागिने सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आले.
तसेच किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण व सुरेश तुळशीराम चव्हाण यांना आणखी विश्वासात घेऊन त्याचेकडे घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण यांने सागितले की, काही दिवसापुर्वी त्यांनी सुरेश तुळशीराम चव्हाण व त्याचा आणखी एक साथीदार असे मिळुन कवठेमहांकाळ, जत, उमदी या ठिकाणीहुन बंद घराची कुलुपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली असल्याचे सागितले. त्यावेळी या चोरीच्या गुन्हयाबाबत माहिती घेतली असता, वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे, पोलीस | उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी किशन ऊर्फ कल्लाप्पा चव्हाण व सुरेश तुळशीराम चव्हाण यांना चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम याबाबत तपास करुन त्यांचेकडुन उर्वरीत सोन्या चांदीचे दागिणे अंदाजे ८,६५,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल सपोनि संदीप शिंदे यांनी सविस्तर पंचनाम्याने पंचासमक्ष जप्त केला आहे.
आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com