सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील सन २०१७ मधील फेटल अपघाताधील आरोपीस २ वर्षे साधा कारावासाची व ३५००/-रु दंड भरणेची शिक्षा

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली ;

पोलीस ठाणे
सांगली ग्रामीण

गुरनं ११९/२०१७ ३०४(अ),२७९, ३३७,३३८ मोवाक १८४

भक्ती रमेश कुंभार रा ता. मिरज जि. सांगली

बुधगांव

शिक्षेचा तपशील

दोन वर्षे साधा कारावास व ३५००/- रु.दंड

न्यायालय मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २ रे सांगली

आरोपीचे नांव

नाथाप्पा रामाप्पा कांबळे वय ५३ रा. हनुमाननगर गल्ली नं. ७ सांगली मुळ रा.निवरगी ता. इंडी जि. विजापुर

राज्य, कर्नाटक

तपासी अंमलदार, सरकारी अभियोक्ता व कोर्ट अंमलदार

मा. उपविभागीय पो. अधिकारी श्रीमती विमला एम, भापोसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सांगली ग्रामीण पो. ठाणे

सरकारी अभियोक्ता सांगली कोर्ट श्री एस.एम. पखाली, श्री मुजावर, श्रीमती दिप्ती पाटील तपासी अंमलदार-सपोफौ गुंडा गोविंद पवार, तत्कालीन तपासी अंमलदार सांगली ग्रामीण पो. ठाणे

कोर्ट अंमलदार मपोह/१८०९ विशाखा दिपक पाटील, मपोकों/२३५९ संगीता खंडू मुंढे सांगली ग्रामीण पो. ठाणे गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दि.०५.०८.१७ रोजी १६.०० या सुमारास बुंधगांव गावाचे हददीत साईदत्त शैपिंग सेंटरचे समोर माधवनगर ते कवलापुर जाणारे रोडवर आरोपी नाथाप्पा रामाप्पा कांबळे रा. हनुमाननगर सांगली याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड ट्रक क्रं एम.एच.१० एक्यु ५४५६ हा भरधाव वेगात चालवून रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन समोरुन चाललेल्या हिरो अॅक्टीव्हा मो. सायकल के एम.एच.१० बी.वाय २८३३ ला पाठीमागुन घडक देवुन मागे बसलेली मुलगी कु. भार्गवी रमेश कुंभार वय १० वर्ष हिस गंभीर जखमी करुन तिचे मरणास कारणीभुत झाला होता. सदर गुन्हयाचा तपास यातील तत्कालीन तपासी अंमलदार सपोफौ गुंडा पवार यांनी उत्कृष्टप्रकारे करुन सर्व पुराये उपलब्ध करुन वेळेत दोषारोप पत्र मा. न्यायालयमध्ये सादर केले. मा. न्यायालयामध्ये सदर गुन्हा मा. जेएमएफसी २ रे न्यायालय सांगली या न्यायालयामध्ये सरकारी अभियोक्ता सरकारी अमियोक्ता सांगली कोर्ट श्री एस.एम. पखाली, श्री मुजावर, श्रीमती दिप्ती पाटील यांचेकडून चालवून गुन्हयातील सर्व साक्षीदार पंच फितुर न होता मा. न्यायालयाने यातील आरोपीस शिक्षा दोन वर्षे साधा कारावास व ३५००/- रु. दंड सुनावलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन तपासी अंमलदार सपोफौ गुंडा पवार यांनी केला असून मा. न्यायालयामध्ये सरकारी अभियोक्ता सरकारी अभियोक्ता सांगली कोर्ट श्री एस.एम. पखाली, श्रीमती दिप्ती पाटील यांनी काम चालवून कोर्ट अंमलदार मपोह/१८०९ विशाखा दिपक पाटील, मपोकों/२३५९ संगीता खंडू मुंढे सांगली ग्रामीण पो. ठाणे यांनी काम पाहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट