सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील धिरज नाईक टोळी व आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील शाहरूख पवार टोळी दोन वर्षासाठी हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार धिरज नाईक टोळी तसेच आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार शाहरूख पवार या दोन्ही गुन्हेगारी टोळयांना मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.






सांगली ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख अ. नं. १) धिरज भारत नाईक, वय २३ वर्षे २) संतोष ऊर्फ अशोक नाईक, वय २७ वर्षे ३) अक्षय ऊर्फ आकाश सतिश नाईक, वय २७ वर्षे, सर्व रा कवलापूर, ता मिरज, जि सांगली या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२४ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुन, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर बिगरपरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत माजवणे, गैरकायदयाची मंडळी जमवून इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, अपहरण करून इच्छापुर्वक दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत. नमुद दोन्ही टोळ्यातील सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील टोळी प्रमुख अ. नं. १) धिरज भारत नाईक, चय २३ वर्षे २) संतोष ऊर्फ अशोक नाईक, वय २७ वर्षे ३) अक्षय ऊर्फ आकाश सतिश नाईक, वय २७ वर्षे, सर्व रा कवलापूर, ता मिरज, जि सांगली यांना सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्हयातून २ वर्षे कालावधी करिता तडीपार केलेबाबत आदेश दि. १९.१०.२०२४ रोजी पारीत केला आहे.
सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ शाखा सांगली, किरण चौगले, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोहेकों / अमोल ऐदाळे, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली तसेच पोहेकों/मेघराज रूपनर, पोना/बंडू पवार, पोकों/ हिम्मत शेख सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, यांनी भाग घेतला.
तसेच आटपाडी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये तसेच लगतचा जिल्हा सोलापूर येथे यातील हद्दपार टोळी प्रमुख अ. नं. १) शाहरूख विजय पवार, वय ३५ वर्षे, रा मापटेमळा, आटपाडी, जि सांगली २) लखन विजय पवार, वय ४५ वर्षे ३) देवगन ऊर्फ देव्या बापू पवार, वय २६ वर्षे, सर्व रा- मापटेमळा, आटपाडी, जि सांगली या टोळीविरुद्ध सन २०१७ ते २०२४ मध्ये बेकायदा जमाव जमवून, रात्री व दिवसा घरफोडी चोरी व नुकसान करणे असे गुन्हे दाखल आहेत. नमुद दोन्ही टोळयातील सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी आटपाडी पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग, विटा यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार आटपाडी पोलीस ठाणेकडील टोळी प्रमुख अ. नं. १) शाहरूख विजय पवार, वय ३५ वर्षे, रा मापटेमळा, आटपाडी, जि सांगली २) लखन विजय पवार, वय ४५ वर्षे ३) देवगन ऊर्फ देव्या बापू पवार, वय २६ वर्षे, सर्व रा मापटेमळा, आटपाडी, जि सांगली यांना सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयातून २ वर्षे कालावधी करिता दि. १९.१०.२०२४ रोजी तडीपारीचा आदेश पारीत केला आहे.
टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे. सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ शाखा सांगली, विनय बहिर, पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस ठाणे, पोहेकों/ अमोल ऐदाळे, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली तसेच, पोहेकों/उमर फकीर, पोहेकों/दादासाहेब ठोंबरे, पोकों/ प्रमोद ठोंबरे आटपाडी पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com