सांगली पोलीसांकडून २६ जुन “जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन” निमित्त प्रचोधन व मार्गदर्शन कार्यक्रम साजरा…

0
Spread the love

सांगली

सह संपादक -रणजित मस्के

२६ जुन २०२५ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत विदयार्थ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पोदार इंटरनॅशनल स्कुल, सांगली येथे करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली तथा सचिव, जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती (NCORD), प्राचार्य श्री. जी. बी. पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कुल, सांगली यांचे उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला,

महाराष्ट्र गीत गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन प्राचार्य श्री. जी. बी. पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना श्री. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. अमन शेख, पोलीस उपनिरीक्षक, एन.सी.बी. मुंबई यांनी सर्वाना अंमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परीणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत ऑनलाईन प्रबोधन व मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विदयार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून अलिप्त राहणेची शपथ घेतली.

सदर कार्यक्रम दरम्यान पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी तयार करणेत आलेला व्हिडीओ तसेच शिक्षण विभागामार्फत जिल्हयातील सर्व शालेय विदयार्थ्यांमार्फत अंमली पदार्थ विरोधी तयार करणेत आलेले व्हिडीओ दाखवण्यात आले.

पोलीस निरीक्षक, श्री. सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली, सदर कार्यक्रमास पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली येथील विदयार्थी, विदयार्थिनी, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.

सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त ठिकठिकाणी अंमली पदार्थ विरोधी शपथ, प्रभात फे-या, मेळावे तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १२ ठिकाणी प्रभात फे-या, २६ ठिकाणी पोलीस ठाणे हददीतील शाळा, महाविदयालयात असे कार्यक्रम घेण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे ठिकाणी विदयार्थ्यांना २६ जुन जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुशंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेमार्फत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले, त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाणे हददीत अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुशंगाने पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.

सांगली जिल्हा पोलीस दलाने आज रोजी घेण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर कार्यक्रमास शाळा व महाविदयालयातील १० हजार पेक्षा जास्त विदयार्थी व विदयार्थ्यांनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट