सांगली पोलीसानी एम. डी. ड्रग्ज गुन्हयातील ३ आरोपीस ठोकल्या बेड्या..

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :
पोलीस स्टेशन
विटा
गु.घ.ता.वेळ व ठिकाण
दि. २७.०१.२०२५ रोजी १९.४५ वा. दरम्यान रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज, विटा एम.आय.डी.सी एरीया मध्ये कार्वे
गुन्हा रजि नंबर व कलम
५२/२०२५ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क) २१ (क), २९
गु.दा.ता.वेळ दि. २८.०१.२०२५
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
फिर्यादी नाव
सागर गिरीजापती टिंगरे, पोहेका / ७१२, नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेकॉ सागर टिंगरे पोहेकाँ / नागेश खरात पोना / संदिप नलावडे
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, सुनिल फुलारी
मा. मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर,यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था.गु.अ.शाखा, सांगली,
सपोनि पंकज पवार, जयदिप कळेकर, नितीन सावंत स्था.गु.अ. शाखा, सांगली,पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील, स्था. गु.अ.शाखा, सांगली,सपोफौ / अच्युत सुर्यवंशी, निसार मुलाणी,
पोहवा / सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल ऐदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे,संजय पाटील, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, अतुल माने, शिवाजी सिद पोना/संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकर, रणजित जाधव
पोकों/विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सोमनाथ पंतगे, सुमित सुर्यवंशी, गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे,
आरोपीची नावः-
१) रहुदिप धानजी बोरिचा, वय ४१ वर्ष, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता. भरुच, जि. सुरत राज्य गुजरात
२) सुलेमान जोहर शेख, वय ३२ वर्ष, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई)
३) बलराज अमर कातारी, वय २४ वर्ष, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा
४) जितेंद्र शरद परमार, वय ४१ वर्षे, रा सुमंगल सोसायटी, बी विंग, फ्लॅट नं. २४.पहिला मजला, नागडोंगरी चेंडरे, ता अलिबाग, जि रायगड, सध्या रा रहेजा हॉस्पीटल जवळ, ताहिर बेकरीच्या वर, माहिम १६, मुंबई.
५) अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख, वय ५३ वर्षे, रा अल मोहमदिया वेलफेअर असोसिएशन, पाठणवाडी, रूम नं. १, उस्मानिया मस्दिचे बाजूला, फिल्डर पाडा, पवई मुंबई.
६) सरदार उत्तम पाटील, वय ३४ वर्षे, रा शेणे, ता वाळवा, जि सांगली
गुन्हयाची थोडक्यात हकीकतः-
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा सांगली यांचेकडे देवून सदर गुन्हयाचा सखोल तपास करून मुख्य आरोपी अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा सांगली गुन्हयातील अटक आरोपी क्र. १ ते ३ यांचेकडे सखोल तपास करीत असताना त्यांनी सांगितले की, सदर गुन्हयातील आरोपी नं. १ ते ६ हे ऑर्थर रोड जेल, मुंबई मध्ये त्यांची ओळख झाली. जामीनावर मुक्त झाल्यावर सर्व आरोपीनी एकत्र येवून एम. डी. ड्रग्ज तयार करणेचा कारखाना सुरू करणेचे ठरवून त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी आरोपी नं. १ याने दिल्ली येथून मागवून आरोपी नं. २ याने दिल्लीच्या कंपनीस पैसे पाठविले होते व सदरची मशिनरी माऊली इंडस्ट्रीज, विटा कार्वे एम.आय.डी.सी येथे आरोपी नं. १ व ३ यांनी बसविली होती. सदर मशिनरी मागविण्याकरीता आरोपी नं. ४ यांनी आर्थिक मदत केली होती. सदर कारखान्यामध्ये आवश्यक असलेले केमिकल्स वापी, गुजरात येथून मागविण्यात आले होते. सदर कारखान्यामध्ये एम. डी. ड्रग्ज तयार करणेसाठी आरोपी नं. १ ते ३ यांना मार्गदर्शन आरोपी नं. ६ याने केले होते असे सांगितले आहे.
सदर आरोपी नं. १ ते ३ यांना मा. न्यायालयाने १० दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपी नं. १ ते ३ यांनी आरोपी नं. ४ जितेंद्र शरद परमार याने सदरचा एम. डी. ड्रग्ज कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. सदर कारखान्यामध्ये एम. डी. ड्रग्ज तयार करणेसाठी आरोपी नं. ६ सरदार उत्तम पाटील याने मार्गदर्शन केले होते, तो माऊली इंडस्ट्रीज, विटा कार्वे एम.आय.डी.सी येथे २ ते ३ वेळा येवून गेला होता. आम्ही तयार केलेला एम. डी. ड्रग्ज आरोपी नं. ३ हा आरोपी नं. ५ अब्दुल रज्जाक अब्दुलकादर शेख यास पुणे, मुंबई या ठिकाणी नेऊन देत होता असे सांगितले आहे.
त्याप्रमाणे आरोपी नं. ४ ते ६ यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करून त्यांना तांत्रिक व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून सदर गुन्हयात आरोपी नं. ४ ते ६ यांना फलटण येथून तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी नं. १ रहुदिप धानजी बोरिचा याचेवर अग्रीपाडा पोलीस ठाणे, विले पार्ले पोलीस ठाणे व एम.आय.डी.सी. मुंबई शहर येथे चोरी व फसवणूकिचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नं. २ सुलेमान जोहर शेख याचेवर अँटी नॉर्कोटीक्स सेल, मुंबई (वरळी युनिट) व ए. टी. एस. मुंबई (विक्रोळी युनिट) येथे एन. डी. पी. एस. चे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नं. ३ बलराज अमर कातारी याचेवर विटा पोलीस ठाणे व माटुंगा (ठाणे) पोलीस ठाणे येथे घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नं. ४ याचेवर पनवेल शहर पोलीस ठाणे व ए. टी. एस. मुंबई (विक्रोळी युनिट) येथे फसवणूकीचे व एन. डी. पी. एस. चे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नं. ५ व ६ यांचेवर ए. टी. एस. मुंबई (विक्रोळी युनिट) एन. डी. पी. एस. गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयात वापरलेली मशिनरी व केमिकल्स तपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करून मुंबई, दिल्ली व गुजरात येथे रवाना करण्यात आलेली आहेत.
तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली हे करीत