सांगली पोलीसानी जिल्हयातील ०९ पोलीस ठाणेमधील वेगवेगळ्या १७ गुन्हयातील ८४,००,०००/-रू. किंमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल जाळून केला नाश

सह संपादक – रणजित मस्के
सांगली
मार्फत






पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली. अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी.
ठिकाण
दिनांक व वेळ
सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. दि. ११.०४.२०२५ रोजी
लि. मिरज एम.आय.डी.सी.,
ता मिरज, जि सांगली
१३.०० ते १८.३० वा चे दरम्यान
कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार
मा. पोलीस अधीक्षक तथा अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली
सदस्य- श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,
सदस्य- दादासाहेब चुडाप्पा, पोलीस उप अधीक्षक, गृह, सांगली
सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, सांगली.
समाधान नरवडे, सहा. रासायनिक विश्लेषक, कोल्हापूर विभाग.
उदय कोळी, निरीक्षक, शास्त्र सहायक वैध मापन शास्त्र, सांगली विभाग, सांगली.
सचिन हरभड, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, सांगली.
सपोनि नितीन सांवत, सपोनि पंकज पवार, स्था.गु.अ. शाखा सांगली, पोह संकेत मगदुम, पोशि सोमनाथ पतंगे
स्था.गु.अ. शाखा, सांगली तसेच ०९ पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकून पोलीस अंमलदार.
पोलीस ठाणे
मिरज शहर, सांगली शहर, सांगली ग्रामीण, कुपवाड एम.आय.डी.सी, उमदी, कवठेमहांकाळ, तासगांव, कुरळप, आष्टा
एकूण मुद्देमालाचे वर्णन
सांगली जिल्यातील पोलीस ठाणेचा वेगवेगळ्या १७ गुन्हयातील ८१३.२३२ किलोग्रॅम ८४,००,०००/-रु. वजनाचा गांजा,
ब्राऊन शुगर, कोकेन असा मुद्देमाल
थोडक्यात माहिती
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना १०० दिवसांचा कृत्री आराखडा दिलेला आहे. त्याअन्यये पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्हयातली मुद्देमाल १०० दिवसांत नाश करणेबाचत सुचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मा. पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अॅन्टी डूग टास्क फोर्स, सांगली च्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या ०९ पोलीस ठाणेकडील एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ प्रमाणे लागवड, वाहतुक, विक्री, सेवन अशा वेगवेगळया दाखल असलेल्या गुन्हयातील सन १९८६ पासून ते सन २०२४ पर्यंतचा मुद्देमाल हा एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ यांमधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाउन मध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला होता. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाचत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरु करणेचाचत आदेशीत केले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह संकेत मगदुम, पोशि सोमनाथ पतंगे व वरील पोलीस ठाणेकडील कारकुन यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाउन मध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाचत मा. न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या ०९ पोलीस ठाणेकडील १७ गुन्हयातील मुद्देमाल नाश करणेचाचतचे आदेश प्राप्त करून घेतले. तसेच मा. पोलीस महासंचालक, दशहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सीआयडी, पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाश बाबत परवानगी घेवून तसेच त्याबाचतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्हयात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी ( अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली, सदस्य मा. पोलीस उप अधीक्षक गृह सांगली) स्थापन केली. सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाउन मध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल हा एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ मधील कलम ५२ (अ) या कलमाप्रमाणे दि ११.०४.२०२५ रोजी सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. लि. मिरज एम.आय.डी.सी., ता मिरज, जि सांगली येथे दुपारी १३.०० वा. ते १८.३० वा. चे दरम्यान योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नाश करणेत आला.
सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्हयातील आष्टा पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, कुरळप पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हयातील, उमदी पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हयातील, तासगाव पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हयातील, मिरज शहर पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हयातील, सांगली शहर पोलीस ठाणेकडील ०५ गुन्हयातील, अशा वेगवेगळया ०९ पोलीस ठाणेकडील एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ प्रमाणे लागवड, बाहतुक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या १७ गुन्हयातील सदरचा ८१३.२३२ किलोग्रॅम वजनाचा व ८४,००,०००/-रु. किंमतीचा गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल त्यामध्ये समावेश होता.
सदर प्रकिया एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ मधील कलम ५२ अ या कलमाप्रमाणे दोन शासकीय पंचासमक्ष व कमिटी अध्यक्ष, सदस्य यांचे समक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदुषण व त्यामुळे आजुबाजूचे परीसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन दल त्याचप्रमाणे सहा. रासायनिक विश्लेषक, कोल्हापूर, वैध मापन शास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे उपस्थित व योग्य त्या बंदोबस्तात पार पाडण्यात आली. सदर पुर्ण प्रकियेत सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. लि. मिरज एम.आय.डी.सी., ता मिरज, जि सांगली यांचेकडील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप पुगे यांनी डॉ. मेघना कोरे, सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. लि. मिरज एम.आय.डी.सी. यांचे आभार मानले आहेत.