शिराळा येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड करून सांगली पोलीसांनी आरोपीस केली अटक..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :

गुरन क्र आणि कलम

भाग ५ गुरनं १११/२०२४ भा.द.वि.स कलम ३०२,२०१

वा. दि. २०/०५/२०२४ रोजी १८:४६

दिनांक २०/०५/२०२४ रोजी सकाळी ०९.२० वा पुर्वी नक्की तारीख वेळ माहिती नाही, आय. टी. आय. कॉलेज ते नाथ मंदिर जाणारे शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीजवळ, श्री. आलय हॉटेलच्या अलीकडे, साकव पुलाचे खाली, पूर्व बाजूस, शिराळा ता. शिराळा जि. सांगली

फिर्यादी नाव

सुनिल आकाराम पेटकर पोहेकों/९४० नेमणुक शिराळा पोलीस ठाणे

माहिती कशी प्राप्त झाली

दाखल असलेल्या मिसींग प्रकरणाच्या चौकशीमध्ये व केलेल्या तांत्रिक तपासाव्दारे

कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार

मा. पोलीस अधीक्षक, संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगेश चव्हाण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, शिराळा पोलीस ठाणे

स.पो.नि./हरिषचंद्र गावडे
स.पो.नि./प्रविण साळुंखे,
स.पो.नि. युवराज सरनोबत,
म.स.पो.नि./अनिता मेनकर
स.पो.नि. सिकंदर वर्धन, पो.उप.नि./जयनाथ चव्हाण,
पो.उप.नि/ गणेश खराडे,
पो.उ.नि.कुमार पाटील
सपोफी / महेश गायकवाड,
पोहेकों/विनय माळी , पोहेकों/अरूण पाटील
पोना/शरद बावडेकर,
पोना/प्रशांत देसाई,
पोना/अमर जाधव,
पोना/जितेंद्र थोरात,
पोना / संदीप नलावडे
पोना / उदय माळी,
पोना/सोमनाथ गुंडे
चासपोफी/जगदाळे
चापोहेको/लुगडे
पोहेकों / कालीदास गावडे
पोहेकों/नितीन यादव,
पोहंकों/सचिन थधोतरे
पोहेकों/संदिप पाटील
पोहेकों/शरद जाधव,
पोहेकों/कुबेर खोत
पोकों/शशिकांत शिंदे,
पोकौं/शदर पाटील,
पोकों/राहुल पाटील,
पोकों/तुषार सुर्यवंशी
पोकों/संजय पाटील
पोकों/सोमनाथ पतंगे
चापोकों/सुनिल पाटील
चापोकों/नागराज मांगले

दिनांक ०१.०६.२०२४

आरोपी नाव व पत्ता

१) देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे व्यवसाय फरशी फिटींग रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या रा. रुक्मिनीनगर, सुभद्रा सदन बंगला ता. कराड जि. सातारा

२) साक्षी राजेश जाधव (साक्षी विनायक काळुगडे). रा. पलुस, ता. पलुस, जि. सांगली

३) शोभा राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस, जि. सांगली

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक २०/०५/२०२४ रोजी सकाळी ०९.२० वा पूर्वी नक्की तारीख वेळ माहिती नाही, आय. टी. आय. कॉलेज ते नाथ मंदिर जाणारे शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीजवळ, श्री. आलय हॉटेलच्या अलीकडे, साकय पुलाचे खाली, पूर्व बाजूस कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरून अनोळखी व्यक्तिचा खुन करून त्याचे प्रेत नायलॉनच्या दोरीने गळयास व शरीरास बांधून सतरंजीमध्ये गुंडाळून प्रवासी बॅगमध्ये घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वरील ठिकाणी फेकून दिले. सदर मयताचे प्रेत पुर्णपणे सडले असल्याने तो सांगाडा पुरुष जातीचा आहे अगर स्त्री जातीचा आहे, त्याचे वय काय आहे तसेच सदर मयत हा किती दिवसापुर्वी मयत झाला असावा याबाबत निश्चित सांगता येत नाही अशा प्रकारे शिराळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ मा पोलीस अधीक्षक संदिप घुगे व मा अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर व मा उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. मा पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या नेतृत्वाखाली एकुण पाच तपास पथके तयार करुन त्यांच्यात कामाचे वाटप करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. सदर गुन्हयामध्ये मानवी हाडांचा सांगाडा मिळुन आलेने मयताची ओळख पटवणे खुपच अवघड होते. सदर मृतदेहाची व त्याचे नातेवाईकांची ओळख पटवणेकरीता व अज्ञात आरोपीचे शोधाकरीता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करुन रवाना केली होती. तसेच प्रेताचे कवटीवरून तज्ञाकडुन त्याचे रेखाचित्र तयार केले होते.

गुन्हयाचे घटनास्थळी मिळुन आले प्रेत ज्यात ठेवले होते ती प्रवासी बॅग व मयताचे अंगावरील कपडे तसेच जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील मिसींग या आधारे तपास चालु करणेत आला. सदर गुन्हयाचा तपास अतिशय विलष्ट व गुंतागुंतीचा होता. तरी देखील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरीष्ठांनी वेळोवेळी
केले मार्गदर्शनाप्रमाणे अथक परीश्रम घेवुन मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बेंगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहिती घेवुन एकुण किती बॅगा तयार केल्या, त्या कोणत्या ठिकाणी विक्री केल्या याबाबतची माहिती गोळा करुन तपास केला असता त्यातील एक बॅग पलुस येथे विक्रीस आली होती अशी माहिती प्राप्त झालेने पलुस येथे जावुन सदर बॅग कोणास विक्री केली आहे याबाबत माहिती घेत असता बॅग विक्रेत्याकडुन बॅग घेणाऱ्याचे प्राप्त वर्णनावरुन रेखाचित्र तयार करुन त्या आधारे तपास सुरु असताना पलुस पोलीस ठाणेस दाखल असले मिसींगमधील व्यक्तीचा शोध घेतेवेळी मिसींग नामे राजेश वसंतराव जाथय चय ५३ वर्षे रा. पलुस, ता. पलुस याचे नातेवाईकांकडे चौकशी करत असता त्यांचे नातेवाईक

१) देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या रा. रुक्मिनीनगर, सुभद्रा सदन बंगला, ता. कराड जि. सातारा
२) साक्षी राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस जि. सांगली
३) शोभा राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस जि. सांगली यांचेकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन येत असलेने त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली असुन यातील मयत राजेश वसंतराव जाधव हा दारुचा व्यसनी असुन तो त्याची पत्नी शोभा हिचेवर संशय घेत होता व त्या कारणावरुन तो पत्नी शोभा हिस वरचेवर मारहाण करुन त्रास देता होता त्या कारणावरुन तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात राजेश वसंतराव जाधव याचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले होते अशी त्यांनी कबुली दिलेने त्यांना उपरोक्त गुन्हयात अटक करणेत आली आहे.

सदरचे गुन्हयात मृत व्यक्तीबाबत व आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना पोलीस पथकाने अथक परीश्रम घेवुन मा. पोलीस अधीक्षक संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा, सांगली, स.पो.नि./हरिषचंद्र गायडे, स.पो.नि./ प्रविण साळुंखे, स.पो.नि. युवराज सरनोबत, म.स.पो.नि./अनिता मेनकर स.पो.नि. सिकंदर श्रीवर्धन, पो.उप.नि./जयनाथ चव्हाण, पो.उप.नि/ गणेश खराडे, पो.उ.नि. कुमार पाटील सपोफी / महेश गायकवाड, पोहेकों/ कालीदास गावडे, पोहेकों/नितीन यादव, पोहेकों/संदिप पाटील, पोहेकॉ शरद जाधव, पोना/शरद बावडेकर, पोना/प्रशांत देसाई, पोना/अमर जाधव, पोकों/शशिकांत शिंदे, पोकों/शरद पाटील, पोकों/राहुल पाटील, चापोकों/सुनिल पाटील, चापोकों/नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणणेस परीश्रम घेतले आहेत.

मा पोलीस अधीक्षक, सांगली यांनी वरील तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट