जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यु फोर्स अंतर्गत सांगली जिल्ह्यात वर्दी वितरण सोहळा संपन्न…

प्रतिनिधी-रणजित मस्के
सांगली: रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी ठिक 3 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत हाॅल शिरगाव, कवठे, ता.तासगाव,जिल्हा सांगली येथे जिल्हा रेस्कयु फोर्स टिमचा वर्दी वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.




यावेळी महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार, महाराष्ट्र राज्य युवक सचिव अरविंद कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयकुमार कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवक सचिव मयुर कांबळे इत्यादी पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com