सांगली जिल्हयातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदान प्रदान कार्यक्रम संपन्न..

सांगली
सह संपादक -रणजित मस्के




मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.०१/०७/२०२५ रोजी गुन्हेगारांवर अंकुश रहावा तसेच त्यांचेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सांगली व मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाणे यांचा बहुद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय, सांगली येथे तसेच तासगाव, इस्लामपुर, विटा आणि जत उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रत्येक पोलीस ठाणेस मागील १० वर्षामध्ये २ किंवा २ पेक्षा जास्त शरीराविरुध्द गंभीर गुन्हे (खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत), मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायदयातंर्गत व शस्त्र अधिनियम कायदयातंर्गत दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपी आदान प्रदान मेंहिम आयोजित केली होती.
उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी आदान प्रदान करीता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे माहितीचा फॉर्म (इंटरोगेशन फॉर्म) भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजिवीकेची साधने काय, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कोठे व कोणा सोबत काम करतात, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर, पत्ते इ. बाबत इंत्यभुत माहिती अदययावत करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांचे हालचालीवर लक्ष्य ठेवण्यास सांगितले. तसेच सदर आरोपीनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये, गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेवू नये याबाबत कडक शब्दात ईशारा देऊन त्यांचेवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आढावा घेवून सुचना देण्यात आल्या. सध्या जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीना डी. बी. पथक, बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे, सदर आरोपीना वेळोवेळी चेक करून त्यांचे गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही याबाचत पडताळणी करणेबाबत प्रभारी अधिकारी, डी. बी. पथक यांना सुचना देणेत आल्या आहेत. ज्याचेवर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात म. पो. का. कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे तडीपारीची कारवाई करणेबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देवुन एम. पी. डी. ए., मोका अन्वये कारवाई करणेबाबत सुचना
दिल्या. तसेच यापुढे गुन्हयातील आरोपीवर पोलीस प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याने आरोपीना त्यांचे गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करणेचा इशारा मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी दिला.
सदर आदान प्रदान कार्यक्रमास बहुद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय सांगली येथे मा. पोलीस अधीक्षक, संदीप पुगे, सांगली विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी विमला एम., स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, तसेच सांगली व मिरज उप विभागातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाणेचे डी. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
तसेच तासगाव, विटा, इस्लामपुर आणि जत उप विभागामध्ये आदान प्रदान कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे सुचनेप्रमाणे सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे उप विभागातील प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणेचे डी. बी. पथकाचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सदर आदान प्रदान कार्यक्रमांत संबधीत उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदरची मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर यापुढे बारीक निगराणी ठेवण्यात येणार असलेबाबत सांगितले आहे.