सांगली जिल्हयात दिनांक ७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- सांगली जिल्हयात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावेत कोणतीही जातीय, धार्मिक तेढ, निर्माण होवु नये याकरीता मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी वेळोवेळी स्वतः हजर राहुन मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांचे आदेशाने बंदोबस्त प्रभारी अधिकारी श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली ६ पोलीस उप-अधीक्षक, २५ पोलीस निरीक्षक, १७९८ पोलीस अंमलदार, ९०० होमगार्ड व १ एसआरपीएफ कंपनी असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एनसीसी पथकांनी गणेशोत्सव विसर्जन दरम्यान मदत करुन विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागास मोलाचे सहकार्य केले आहे.






गणेशोत्सव अनुषंगाने मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या. तसेच उपविभागीय व पोलीस ठाणे स्तरावर खालीलप्रमाणे बैठका घेण्यात आलेल्या आहेत.
अ.न. गणेश मंडळे बैठका
मुर्तीकार बैठका
रूट मार्च
शांतता समिती बैठका
मोहल्ला कमिटी बैठका
पोलीस मित्र बैठका
दंगा काबू प्रात्यक्षिक
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक गांव एक गणपती साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यास सांगली जिल्हयात प्रतिसाद देवून ७९ गावांनी एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविली आहे.
सांगली जिल्हयात एकुण ५४७३ सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली होती तसेच सुमारे २.५५,७०० घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यांचे खालीलप्रमाणे विसर्जन करण्यात आलेले आहे.
गणेशोत्सव कालावधीत मागील १० वर्षातील दाखल गुन्हयातील १४०४ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
गणेशोत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदुषण निर्देशाचे उल्लंघन केल्याने १३७ मंडळावर कारवाई करण्यात आलेली आहे. मा. जिल्हाधिकारी सांगली यांनी मानवी शरिरावर दुष्परिणाम करणारे लेझर लाईट व प्लाझमा लाईट यांचा मिरवणुकीमध्ये वापर करणेस प्रतिबंध आदेश जारी केला होता. त्या अंतर्गत लेझर लाईट व प्लाझमा लाईटचा वापर केल्याने १० गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ईद-ए-मिलाद मिरवणुका खालीलप्रमाणे आहेत.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने योग्य नियोजन करून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com