सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहीत्य यांच्या विक्रीतुन शासनास मिळाला ५९ लाख ६८ हजार इतका महसुल..!

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– मा अपर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये निकामी पोलीस वाहने व साहीत्य यांची विक्री करणेकामी केंद्र शासन पुरस्कृत एम.एस.टी.सी या अंगीकृत एजन्सी मार्फत ऑनलाईन पध्दतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील १५ वर्षांवरील २५ चारचाकी, ९० दुचाकी अशी एकुण ११५ वाहने स्क्रैप करणेसाठी अधिकृत आर.व्ही.एस.एफ सेंटर श्री भाग्यलक्षमी रोलींग मिल प्रा.लि. जालना यांनी उच्चत्तम बोली लावल्याने त्यांना सदरबी बाहने रक्रैप करणेकामी देण्यात आलीत उर्वरीत ४१ घारचाकी व १५ दुचाकी अशी एकुण ५६ वाहने व इतर निकामी साहीत्य उच्चत्तम बोली लावणा-या घोलीदार यांना देण्यात आलीत. त्याच्या विक्रीतुन शासनास ५९ लाख ६८ हजार इतका महसुल जमा करणेत आला व निकामी वाहनाची विक्री करुन पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करणेत आली.






मा श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली, श्री दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) सांगली यांचे मार्गदर्शनाखाली श्री सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मो प विभाग सांगली, श्री विकास कोठावळे मो.प पर्यवेक्षक, बापु गायकवाड स.पो.की. संदीप गवळी पो. है. कॉ, गणेश चव्हाण पो.हे.कों, सचिन पवार पो. हे. कों, अजय कांबळे पो.ना यांनी कार्यवाही केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com