सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटी कॅलेंडरचे अनावरण

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली:-
मा.संदीप भ. घुगे पोलीस अधीक्षक सांगली व मा. रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मा. दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा मानद अध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसा. सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अंमलदार यांचे करीता सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसा. सांगली कार्यरत आहे. सदर को- ऑप क्रेडीट सोसा. मार्फत पोलीस सभासदांना कर्ज वाटप, ठेवी, विविध बचत योजना राबविण्यात येत असुन त्याचा पोलीस सभासद हे लाभ घेत आहेत.
सदर सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसा. सांगली कडून पोलीस सभासदांकरीता दरसालाप्रमाणे याही वर्षीची सन २०२५ ची दिनदर्शीका प्रकाशित करण्यात आली असुन आज दि. २७/१२/२०२४ रोजी मा. दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा मानद अध्यक्ष – सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसा. सांगली व पोलीस निरीक्षक भालेराव जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली यांचे हस्ते अनावरण करुन प्रसारित करण्यात आले त्यावेळी सांगली जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडीट सोसा. सांगली चे चेअरमन पोहेकों/अभिजीत पाटील, सदस्य सचिव पोहेकों / प्रशांत कोळी, सचांलक पोहेकों/करण परदेशी, सभासद रविंद्र लांडगे तसेच मॅनेजर वासुदेव पुराणिक, सुरेश स्वामी व इतर सभासद उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com