सांगली जिल्हा डायल ११२ कंट्रोल रुम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवलेची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली

दिनांक ०४.०१.२०२५ रोजी ११.३० वाजता मोबाईल नंबर ९४२२*** वापरकर्ता यांने डायल ११२ कंट्रोल रुम येथे फोन करून ” सांगली कंट्रोल रुम मध्ये बॉम्ब लावला आहे, पोलीस मदत हवी आहे” अशी अर्धवट माहिती देवून फोन कट केला. सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाणे कडील डायल ११२ मशीन नंबर एक वर कर्तव्य बजावित असलेले पोकॉ/१५५३, वसिम आक्रम नुरखान मुलाणी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेवुन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.सदर कॉलचे अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली व एस.टी. स्टैंड येथे बी.डी.डी.एस पथकाव्दारे तपासणी करण्यात आली. परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चिजवस्तु मिळुन आल्या नाहीत. त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गु.र.नं. ५०/२०२५ बी.एन.एस. कलम २१७ प्रमाणे दि. ०४/०१/२०२४ रोजी १५.३९ वा. पोशि १५५३/मुलाणी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरचा कॉलचे अनुषंगाने कॉलर बाबत कॉलचे अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, पोहेकॉ १६७० मगदुम, ६६९ ऐदाळे, पोशि १५३० कॅप्टन गुंडवाडे, १९५१ शिंदे यांनी सदरचा कॉलर हा मालगाव येथील तवठे मळयाजवळ राहत असल्याची खात्री केली. त्याच्या आधारे खोटा कॉल करणा-या कॉलरला ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाय विचारता त्याने त्याचे नाव यमनाप्पा मरगप्पा माडर, वय ५० वर्षे, रा तवठे मळा, मालगाव, ता मिरज असल्याचे सांगितले.सदरचा कॉल त्याने दारुचे नशेत केल्याचे कबुल केले असुन सदर कॉलरने यापुर्वी सुध्दा सन २०२३ मध्ये असाच कॉल केला असलेबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे. सदर इसमास पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.तरी असे कोणतेही खोटे कॉल करुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेस अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट