सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील तबरेज तांबोळी टोळी अखेर हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार तबरेज तांबोळी टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काबुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
सांगली शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख
१) तबरेज बाबु तांबोळी, वय ३२ वर्षे, रा. पुराणी मशीद जवळ, सांगली. टोळी सदस्य अ.नं.
२) मोहम्मदजैद फारूख पखाली, वय २१ वर्षे, रा. मुजावर प्लॉट, एस. टी. स्टॅण्ड रोड, सांगली
३) किरण रुपेश भंडारे, वय २४ वर्षे, रा. रमामातानगर, गोंधळे प्लॉट, सांगली.
४) कपिल सुनिल शिंदे, यय २५ वर्षे, रा. सम्राट व्यायाम मंडळ जवळ, सांगली
५) रोहित बाळासाहेब कांबळे, वय २१ वर्षे, रा. गणेशनगर, गोंधळे प्लॉट, ४७१/०८ सांगली या टोळीविरुद्ध सन २०१८ ते २०२४ मध्ये संगनमत करुन खुन करण्यासाठी अपहरण करुन घातक शस्त्राने मारहाण करणे, घातक हत्याराचा धाक दाखवन गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे, गैरकायदयाची मंडळी एकत्र करून सरकारी नोकरावर हल्ला करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करुन घरात घुसुन शिविगाळ मारहाण, दमदाटी करणे, रिक्षा चोरी करणे तसेच राहते घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात घुसुन घरफोडी करणे अशा स्वरुपाचे शरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करीत आहेत.
नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून, अण्णासाहेब जाधय, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांचेकडे चौकशी कामी पाठविला, त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्य दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली, सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्यांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) तबरेज बाबु तांबोळी, वय ३२ वर्षे, रा. मुराणी मशीद जवळ, सांगली, टोळी सदस्य अ.नं. २) मोहम्मदजैव फारूख पखाली, वय २१ वर्षे, रा. मुजावर प्लॉट, एस. टी. स्टॅण्ड रोड, सांगली ३) किरण रुपेश भंडारे, वय २४ वर्षे, रा. रमामातानगर, गोंधळे प्लॉट, सांगली. ४) कपिल सुनिल शिंदे, वय २५ वर्षे, रा. सम्राट व्यायाम मंडळ जवळ, सांगली ५) रोहित बाळासाहेब कांबळे, वय २१ वर्षे, रा. गणेशनगर, गोंधळे प्लॉट, ४७१/०८ सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या २ जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे. आगामी लोकसभा निवडणुका, सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी यापुढेही फडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.





सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, स्थागुअ शाखा सांगली, संजय मोरे, पोलीस निरीक्षक, सांगली शहर पो. ठाणे, श्रेणी पो. उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर, पोहेकों/अमर नरळे, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच पोहेकों/श्रीपाद शिंदे, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com