सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोहम्मद शेख टोळी हद्दपार..

सांगली :
सह संपादक- रणजित मस्के
सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार मोहम्मद शेख टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.


सांगली शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख १) मोहम्मद अब्दुलगणी शेख, वय -२१ वर्षे, रा.५० फुटी रोड शामराव नगर, सांगली. २) संतोष मारुती हाक्के वय २१ वर्षे रा. बागेवाडी ता. जत, जि. सांगली या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२३ मध्ये संगनमत करुन मोटार सायकल चोरी, बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात घुसून घरफोडी करणे अशा स्वरुपाचे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करीत आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, सांगली शहर पोलीस ठाणे-यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, अण्णासाहेब जाधव, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली, सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) मोहम्मद अब्दुलगणी शेख, वय २१ वर्षे, रा.५० फुटी रोड शामराव नगर, सांगली. २) संतोष मारुती हाक्के वय २१ वर्षे रा. बागेवाडी ता. जत, जि. सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या २ जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे. आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, स्थागुअ शाखा सांगली, संजय मोरे, पोलीस निरीक्षक, सांगली शहर पो. ठाणे, पोहेकों / अमोल ऐदाळे, पोहेकों बसवराज शिरगुप्पी, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच पोहेकों/श्रीपाद शिंदे, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.