संघर्ष संघटना महाराष्ट्र संस्था यांनी शिक्षण दिनी शिक्षकांचे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित..

उपसंपादक. मंगेश उईके
पालघर :- दि. ०५/०९/२०२४ रोजी देवभूमी सभागृह सफाळे येथे संघर्ष संघटना महाराष्ट्र संस्थे चे संस्थापक अध्यक्षा सौ. सुमनताई मानकर यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधा कृष्ण यांच्या जन्मदिना निमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या शिक्षक दिना निमित्त पालघर जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन कार्क्रम साजरा केला गेला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील साहेब तसेच पालघर घरकुल योजना अभियंता विक्रम गावंडे, महाराष्ट्र पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब गुंड,सरपंचव सदस्य व पत्रकार ऋषिकेश जाधव,तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव तथा क्राइम इंस्ट्रिक्शन ब्युरो जिल्हा अध्यक्ष, मंगेश उईके व टीम तसेच तसेच इतर मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.








सदर या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक,शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविका यांना शिक्षकांचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सन्मान चिन्हाने सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात बोईसर विभाग विधानसभा आमदार राजेशजी पाटील स्वतः उपस्थित राहून सुमनताई मानकर यांचे कौतुक करत.आपल्या चार शब्दात शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात अनेकांनी मनोगत व्यक्त केले पण घरकुल योजना अभियंता त्यापैकी भावनिक मनोगत विक्रम गावंडे घरकुल योजना अभियंता यांचे मनोगत भावनिक होते.त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले की त्यांच्या आजींनी कशा पद्धतीने स्वतः शिकलेली नसताना सुद्धा आपल्या नातवाला शाळेत जाण्याचा मार्ग दाखवून आज इंजिनीयर म्हणून घडवले. वडील नसतानाही त्यांच्या आईंनी कष्ट करून कशा पद्धतीने मुलांना वाढवले . त्यानंतर पारगाव मराठी जिल्हा परिषद शाळेतील किरण जाधव सरांनी आपले मनोगत व शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. आज संघर्ष संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्षा सौ.सुमन ताईं मानकर यांनी केलेले शिक्षकांचे कौतुक त्यांची समाजसेवा हे सारे अद्भुत आहे.
अनेक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची मुले ही कुठेतरी इंग्लिश शाळेत असतात पण हा असा पहिला कार्यक्रम ज्याच्यामध्ये स्वतः त्यांची मुलगी पुष्पगुच्छ त्याच्यानंतर सन्मानपत्र किंवा सन्मानचिन्ह घेऊन सेवेसाठी हजर होत्या त्या स्वतः डॉक्टर असून त्यांना समाजसेवा आपल्या आईने दिलेली शिकवण आणि त्यांनी केलेली परतफेड म्हणजे आज शिक्षक दिनी त्यांच्या गुरूंचा सन्मान.
शिक्षक म्हटलं की लहानपण आठवते आणि पुन्हा त्या भावना जाग्या होतात पुन्हा तो वर्ग आठवतो शिक्षकांनी केलेले संस्कार आठवतात एकाच शाळेतील अनेक विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा कार्यरत होतात किंवा नेते बनतात तुम्ही एक चांगला नागरिक बनतात हे सर्व शिक्षक घडवतात आज त्यानी शिक्षक दिनी संभाषण करून शिक्षकांच्या कौतुक करत आलेल्या सर्व पाहुणे व शिक्षकांचे आभार मानत कार्यक्रम संपन्न केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com