उमदी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यावर बेधडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली – जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यावर त्वरित अवैध धंद्यांवर कारवाईला सुरवात केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर संदीप शिंदे यांनी निर्धार केला होता की, उमदी ठाण्यांतर्गत सुरू असलेले अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. ते करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. त्यानुसार त्यांनी दोन दिवसांनी लगेच कारवाईला सुरवात केली आहे.

उमदी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील अवैध मटका, जुगार, बेकायदेशीर दारूविक्री व गांजा असे अवैध धंदे सुरू आहेत. त्याविरोधात सहायक निरीक्षक शिंदे यांनी कडक कारवाईस सुरवात केली आहे. संदीप शिंदे यांनी अंकलगी, सोन्याळ, बेळोंडगी, पांढरेवाडी येथील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली, संख येथे जुगारावर कारवाई केली. तसेच संख येथील शेतीमध्ये गांजाची पीक असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. उमदी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात बेकायदेशीर दारू विक्री, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांवर कारवाई करणार, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट