माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे थंडीतुन शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव: माणगांव तालुक्यातील विळे विभागातील मौजे सणसवाडी येथे एकाचा खून झाल्याची घटना आज घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान मौजे विळे आदिवासीवाडी गावच्या हद्दीत विळे हायस्कूलच्या शेतामध्ये सदरील घटना घडली आहे.

दि.17 जानेवारी 2023 रोजी रात्री मयत सयाजी धोंडू पवार रा. सणसवाडी हे शेकोटी शेकत असताना त्याच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.18 जानेवारी 2023 रोजी मयत व आरोपी हे विळे आदिवासीवाडी येथून दारू पिऊन घरी जात असताना विळे हायस्कूल समोरील शेतामध्ये आल्यावर मयत सयाजी पवार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी मुकेश नलावडे यांनी संगनमत करून हाताबुक्याने व कोणत्यातरी हत्याराने जखमी केले झालेल्या मारहाणीमुळे सयाजी पवार याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. जि. नं 10/2023 भा. द. वि. स क 302,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलं असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सह. पोलीस. निरीक्षक श्री लहागे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com