सणासुदीच्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे आज दि. १५/०७/२०२५ रोजी पोलीस, महसुल, जिल्हा परीषद, शिक्षण तसेच आरोग्य विभागांची समन्वय बैठक पार…

सह संपादक -रणजित मस्के
सांगली

सदर बैठकीमध्ये पोलीस, महसुल व शिक्षण विभागाच्या समन्वयातुन कन्या सबलीकरण योजना राबविणेबाबत चर्चा झाली. महिला अत्याचाऱ्याच्या अनुशंगाने करावयाच्या उपाययोजना अंतर्गत मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे, शिक्षण, पोलीस व महसुल विभागामार्फत शाळा व कॉलेजमधील मुला मुलींना मार्गदर्शन करणेबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निश्चीत करण्यात आले.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने येणारे सण उत्सव, निवडणूका, शक्तीपीठ महामार्ग आंदोलन, रेल्वे पुर्नवसन आंदोलन याबाचत चर्चा झाली. या पार्श्वभुमीवर पोलीसांनी जास्तीत जास्त गुणात्मक प्रतिबंधक कारवाया करणे व त्याअनुशंगाने उप विभागीय अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसिलदार व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचेमध्ये समन्वय ठेवणेबाबत निर्देशित करण्यात आले.
जिल्हयातील रिक्त असणारी पोलीस पाटील पदे तात्काळ भरणेसाठी उप विभागीय अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. गावागावातील तंटामुक्ती समित्या नव्याने निर्माण करणेचाबत व त्याअनुशंगाने येणाऱ्या ग्रामसभेत निर्णय घेणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांना दिले.
जिल्हयातील अंमली पदार्थ अनुशंगाने करण्यात येणाऱ्या कारवायाबाबत आढावा घेवून त्यामध्ये सातत्य ठेवून अंमली पदार्थावर पुर्णपणे अंकुश लावणेसाठी शिक्षण विभागाची मदत घेवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करणेबाबतच्या सुचना पोलीस व शिक्षण विभागास दिल्या.
शासकीय रुग्णालयाकडुन येणारी पोक्सो कायद्यातंर्गत व इतर एम. एल. सी. संबधीत पोलीस ठाणेस तात्काळ देणेबाबत तसेच जखमांचे प्रमाणपत्र तात्काळ देणेबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक सांगली व अधिष्ठाता, शासकिय रुग्णालय, मिरज यांना सुचना देण्यात आल्या.
या समन्वय बैठकीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा शल्यचिकीत्सक, अधिष्ठाता, मिरज शासकिय रुग्णालय तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.