सामुहिकरित्या बलात्कार करणारे आरोपी अक्षय गवते आणि देवीदास गवते यांना मा. अतिरिक्त सत्र न्यायालय भिवंडी यांनी ठोठावली १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा..

उपसंपादक -मंगेश उईके
जव्हार :

जव्हार पोलीस ठाणे यांच्या उत्कृष्ट तपास कौशल्याने आरोपींस मिळाली शिक्षा.
जव्हार पोलीस ठाणे गु.र.नं. १६/२०१८ भा.द.वि.स कलम ३७६ (ड), ३७६ (२) (i), पोक्सो कायदा कलम ४, ५, ८, ९, १० प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील आरोपी १) अक्षय पांडूरंग गवते २) देवीदास धर्मेश गवते यांनी पिडीत अल्पवयीन मुलीचा सामुहिकरित्या बलात्कार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास हा सपोनि/बी. टी. घनदाट, तत्कालीन नेमणूक जव्हार पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द कौशल्यपुर्ण सबळ पुरावा गोळा करुन मा. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, क्रमांक १, भिवंडी येथे दोषारोपपत्र सादर केले होते. नमूद दोन्ही आरोपींविरूध्द अपराध केल्याचा पुरावा शाबीत झाल्याने दि.२८/०७/२०२५ रोजी मा. एन. एल. काळे, जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, भिवंडी यांनी दोन्ही आरोपीस भा.दं. वि.सं. कलम ३७६ (२), (i) अन्वये १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी १० हजार रूपये द्रव्यदंड तसेच द्रव्यदंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरी तसेच पोक्सो कायदा कलम १० अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपये द्रव्यदंड तसेच द्रव्यदंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हयात सरकारी वकील श्री. विवेक कडू, तपासी अधिकारी सपोनि/बी. टी. घनदाट, तत्कालीन नेमणूक जव्हार पोलीस ठाणे, नोडल अधिकारी पोउपनि /वारे व कोर्ट पैरवी पोहवा / ८३० वाय. आर. पाचोरे यांनी कामकाज पाहिले.