सम्राटनगर कोल्हापूर येथील जबरी चोरीचा गुन्हा “12 तासाचे आत उघड” दोन आरोपी अटक…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

कोल्हापूर ;

440 ग्रॅम सोन्याचे दागीने व 75,000/- रु रोख रक्कम असा एकूण 50,25,000/- रु किंमतीचा
मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई

तक्रारदार नामे श्री राजीव जयकुमार पाटील, वय 60, रा. गोविंद सावंत हौसींग सोसायटी सम्राटनगर कोल्हापूर हे उद्योजक असून ते घरातील सर्व लोक नेहमी दिवसभर घर बंद करुन व्यवसायाच्या ठिकाणी जातात. नेहमीप्रमाणे दि. 12.06.2025 रोजी राजीव पाटील व त्यांचे घरातील इतर नातेवाईक व्यवसायाचे ठिकाणी घरामध्ये राजीव पाटील यांचे वयस्कर सासरे असल्याने त्यांना घरी ठेवून बाहेरील बाजूस कुलूप लावून गेले होते. दुपारी 15.15 वा ते 15.30 वा. चे सुमारास दोन हेल्मेट धारी अज्ञात चोरटयांनी घराचे बाहेरील बाजूस ठेवलेले चावीने घराचा मुख्य दरवाजा उघडुन आत प्रवेश करून फिर्यादीचे सास-यांना चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी यांचे घरातील सोन्याचे दागीने असलेले गोदरेज कंपनीचे कॉम्पेक्ट साईजचे दोन लॉकर चोरुन नेलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन राजारामपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं. 452/2025 बी.एन.एस.309 (4), 331 (5), 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारे दिवसा जबरी चोरीचा गुन्हा घडलेने गुन्हयाचे ठिकाणी मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके याचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व राजारामपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी भेट दिली. मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिवसा जबरी चोरीचा गुन्हा घडलेने सदर ठिकाणासह कोल्हापूर शहरात भितीचे वातावरण निर्माण होवू शकते याकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.

मा. पोलीस अधीक्षक सो, यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. सदर पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी व आसपासचे परिसराची पाहणी करुन तपास सुरु केला. गुन्हा घडले ठिकाण व गुन्हा घडणेची प्रक्रियाची माहिती घेत असताना सदरचा गुन्हा हा गुन्हा घडले ठिकाणी परिपुर्ण माहिती असणारे इसमानेच केला असावा असा प्राथमिक अंदाज घेवून सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा प्रकाश चौगुले याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असून ते लक्ष्मीटेकडी याठिकाणी वेरणा गाडीतून येणार आहेत अशी माहिती मिळाली. मिळाले माहितीचे अनुषंगाने कोल्हापूर ते बेळगांव जाणारे हायवे रोडवर लक्ष्मी टेकडी येथे तपास पथकाने सापळा लावून 01) प्रकाश
दत्तात्रय चौगुले, व.व.38, रा. हंचनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव व 02) अमित विश्वनाथ शिंदे व.व.25, रा. यादवनगर डवरी वसाहत कोल्हापूर यांना त्यांचे कब्जातील वेरणा गाडी नंबर एम. एच.45/ए.2200 व अॅक्सेस मोपेड गाडी क्र.एम.एच.09/ डी. वाय. 1773 यासह ताब्यात घेतले सदर इसमांचे कब्जातील वाहनांची तपासणी केली असता वेरणा गाडीचे डिकीमध्ये तीन लहान लॉकर दोन बॅगा, चाकु, दोन हेल्मेट, रेनकोट असे साहित्य मिळुन आले. सदर लॉकरबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून सदर इसमांना विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण तपास असता नमुद इसमापैकी प्रकाश दत्तात्रय चौगुले हा राजीव पाटील यांचेकडे ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहे. प्रकाश चौगुले हा फिर्यादी राजीव पाटील यांचेकडे ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेने त्याला त्यांचे घराची सर्व इंत्यभुत माहिती होती. त्याने त्याचा साथीदार अमित विश्वनाथ शिंदे याचे मदतीने काल दि. 12.06.2025 रोजी दुपारचे वेळेस राजीव पाटील यांचे गोविंद सावंत हौसींग सोसायटी सम्राटनगर कोल्हापूर यांचे राहते घरी जावून घराचे बाहेरील बाजूस ठेवलेले चावीने कुलूप काढुन घरात प्रवेश केला. घरामध्ये फिर्यादी यांचे वयस्कर सास-यांना चाकूचा धाक दाखवून घराचे वरचे मजल्यावर जावून वरचे मजल्यावर लॉकरच्या चाव्या ठेवले ठिकाणावरुन चाव्या घेवून फिर्यादी राजीव पाटील यांचे घरातून सोन्याचे दागीने व रोख रक्कम ठेवलेली एकूण तीन लॉकर चोरचे असून तेच लॉकर असलेची कबुली दिली. सदर आरोपींचे कब्जातील वेरणा गाडीत असलेल्या लॉकरमध्ये 440 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम 75,000/- रुपये व गुन्हा करणेकरीता वापरलेली चारचाकी वेरणा व दुचाकी अॅक्सेस असा एकूण 50,25,000/- रु किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे. आरोपींचे कब्जातील मिळालेले मुद्देमालासह त्यांना राजारामपूरी पोलीस ठाणे येथे जमा केले असून पुढील तपास राजारामपूरी पोलीस ठाणे करवी सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री योगेश कुमार गुप्ता साो, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, डॉ. बी. धीरजकुमार साो व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री अजित टिके साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, रुपेश माने, विशाल खराडे, विनोद कांबळे, संतोष बरगे, अरविंद पाटील, रामचंद्र कोळी, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सर्जे, सचिन बेंडखेळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट